धबधबा हा नदीच्या उगमावर किंवा ओढ्यावरील खडकांच्या उंच ठिकाणी तयार होतात; पण कासच्या विस्तीर्ण पठारावर चारी बाजूने खडकांचे मोठमोठे कडे तयार झाले आहेत.
कास : दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने जागतिक वारसा स्थळ आणि फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कासवर शेकडो धबधबे (Waterfalls) कोसळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वेगळेच सौंदर्य दिसून येत आहे. कास पठारावर (Kaas Pathar) सर्वत्र जांभ्या खडकाचा थर आढळतो. विस्तीर्ण अशा कास पठारावरून पडणारे पावसाचे पाणी पठाराच्या कड्यांवरून फेसाळत कोसळताना अनेक ठिकाणी असे धबधबे तयार झाले आहेत.