Seagull Birds : पर्यटकांना पर्वणी! कोकण किनारपट्टीवर अवतरले सीगल पक्षी; दोन-तीन महिने राहणार मुक्काम

कोकण किनारपट्टीवर सीगल पक्षी (Seagull Bird) अवतरले आहेत.
Seagull Birds Arrival Harnai Beach
Seagull Birds Arrival Harnai Beachesakal
Updated on
Summary

थंडीच्या कालावधीमध्ये पुरेसे खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल असलेल्या परिसरात सीगल पक्षी स्थलांतर करून येथे दाखल होतात.

हर्णै : कोकण किनारपट्टीवर सीगल पक्षी (Seagull Bird) अवतरले असून, या पाहुण्यांनी दापोली तालुक्यातील सर्वच समुद्रकिनारे गजबजले आहेत. हर्णैच्या किनाऱ्यावर (Harnai Beach) रपेट मारताना सीगल पक्ष्यांचे थवे दिसू लागल्याने पर्यटकांना (Tourists) ते आकर्षण ठरत असून या थव्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.

किनाऱ्याला थवेच्या थवे येऊन बसतात आणि येणाऱ्या लाटांमध्ये मज्जा करत असतात. विशेषतः सकाळी या पक्ष्यांची गजबज पाहताना एक वेगळीच गंमत वाटते. सीगल पक्ष्यांच्या लयबद्ध हालचाली, भक्ष्य म्हणून छोटे मासे व खेकडे पकडण्यासाठीची शिताफी, आकाशात विहारण्याची शैली पाहता प्रत्यक्षदर्शीची करमणूक होत आहे.

Seagull Birds Arrival Harnai Beach
Manganga River : 143 वर्षांपूर्वी ब्रिटिश राणी व्हिक्टोरियांनी बांधलेल्या तलावात तब्बल 'इतक्या' परदेशी फ्लेमिंगोंची हजेरी

या पक्ष्यांच्या हवेतील सहजसुंदर कसरती देखील पाहण्याजोगा असून या कसरती पाहण्यासाठी अनेकांची पावले समुद्र किनाऱ्यावर वळतात. यावर्षीही या पक्ष्यांचे आगमन झाल्याने किनारा पक्ष्यांच्या सफेद रंगाने न्हाऊन निघाला आहे. पुढील दोन-तीन महिने किनारे या पक्ष्यांनी फुलून जाणार आहेत.

Seagull Birds Arrival Harnai Beach
Tourism News : गणपतीपुळेत पर्यटकांची प्रचंड गर्दी; दररोज तब्बल 20 हजार भाविक-पर्यटकांची नोंद, हॉटेल-लॉजिंग हाऊसफुल

थंडीच्या कालावधीमध्ये पुरेसे खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल असलेल्या परिसरात सीगल पक्षी स्थलांतर करून येथे दाखल होतात. दिवाळी सुटीमुळे किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक दापोलीत दाखल झाले आहेत. या पर्यटकांसाठी सीगल पक्षी म्हणजे पर्वणी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.