श्रावण विशेष : बार्शीतील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन म्हणजे भक्तितीर्थच

श्रावण विशेष : बार्शीतील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन म्हणजे भक्तितीर्थच
श्रावण विशेष : बार्शीतील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन म्हणजे भक्तितीर्थच
श्रावण विशेष : बार्शीतील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन म्हणजे भक्तितीर्थचCanva
Updated on
Summary

श्रावण महिन्यात बार्शी शहरातील बारा ज्योतिर्लिंग, श्री भगवंत मंदिरात येऊन दर सोमवारी भक्तगण घेत असलेले दर्शन, मंदिरावर केलेली रोषणाई, गाभाऱ्यातील फुलांची सजावट पाहण्यासारखी असते.

बार्शी (सोलापूर) : श्रावण महिन्यात बार्शी शहरातील (Barshi) बारा ज्योतिर्लिंग (Bara Jyotirling), श्री भगवंत मंदिरात येऊन दर सोमवारी भक्तगण घेत असलेले दर्शन, मंदिरावर केलेली रोषणाई, गाभाऱ्यातील फुलांची सजावट पाहण्यासारखी असते. बाळेश्वर नाका येथील बाळेश्वर मंदिर, भाजी मंडईजवळील भोगेश्वरी मंदिर, आशा टॉकीजजवळील पाताळेश्वर मंदिर, एकविराई चौकातील मल्लिकार्जुन मंदिर, कचेरी रोडवरील शंकेश्वर मंदिर, शनि मंदिराजवळील गणेश्वर मंदिर, मंगळवार पेठ येथील उत्तरेश्वर मंदिर, तुळशीराम रोडवरील बुद्धेश्वर मंदिर, दाणे गल्लीतील पंचमुखी परमेश्वर मंदिर, भोसले चौकातील भीमाशंकर मंदिर, कुर्डुवाडी (Kurduwadi) रोडवरील रामेश्वर मंदिर येथे श्रावण महिन्यात भक्तिसागर पाहावयास मिळत असतो. शहरातील चंद्रशेखर, माणूरकर, औंधकर, वैरागकर, दहिवडकर, परंडकर, रुद्रपशुपती, वेळापूरकर, माढेकर, पांडेकर, उपळाईकर असे मठ धार्मिक कार्य करीत असून, येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

श्रावण विशेष : बार्शीतील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन म्हणजे भक्तितीर्थच
पाहा, माळशिरस तालुक्‍यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळे

शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर सोलापूर - उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवर बालाघाटच्या पर्वतरांगा, दंडकारण्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेले श्रीक्षेत्र रामलिंग भाविकांसाठी श्रावण महिना पर्वणीच असतो. मंदिर बंद असले तरी पहाटे तीन वाजता पूजा, त्यानंतर अभिषेक, आरती, दुपारी बारा वाजता नैवेद्य, सायंकाळी आठ वाजता आरती होऊन मंदिर बंद असा दिनक्रम आहे. येथील परिसरात वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे धबधबा सुरू आहे.

मायावी हरिणाला पकडण्यासाठी गेलेल्या प्रभू रामचंद्रांच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन सीतेचे अपहरण करून पळालेल्या रावणाचा पाठलाग करून सीतेला सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जटायू पक्ष्याचे आणि रावणाचे युद्ध रामलिंग येथे झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. युद्धानंतर या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे आगमन झाल्यानंतर जखमी अवस्थेतील जटायू पक्ष्याला पाणी पाजण्यासाठी व शिवशंकराची आराधना करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आपल्याजवळील बाणाने पाणी काढले. ते पाणी जटायू पक्ष्याला पाजले. तेथेच त्यांनी स्वत: लिंगाची स्थापना करून शिवआराधना केली. पूजेसाठी बाण मारून पाणी उपलब्ध केले ते ठिकाण आजही गायमुख म्हणून सुपरिचित आहे. रामलिंग द्रोणाच्या आकाराचे मंदिर असून हेमाडपंती वास्तुशिल्पाचा आणि दगडी कामाचा अप्रतिम असा आविष्कार आहे. चोहोबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या मंदिराचा परिसर अतिशय रमणीय असून श्रावणात येथे सर्वत्र हिरवळ असते.

श्रावण विशेष : बार्शीतील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन म्हणजे भक्तितीर्थच
श्रावण विशेष : शिखर शिंगणापूर म्हणजे चैत्र, श्रावण महिन्यातील पर्वणीच

मंदिराच्या चारही बाजूंना डोंगर, दाट जंगल पसरले असून माकडे, वानरे, मोर, हरणे, ससे यासह वन्यप्राण्यांच्या अस्तित्वामुळे परिसराला अभयारण्य म्हणूनही घोषित करण्यात आलेले आहे. आर्य समाजाचे गुरुकुल वैदिक संस्कॄत महाविद्यालय या परिसरातच निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे. शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेले दुर्गादेवी हिलस्टेशन सध्या नव्या दिमाखात उभे आहे. शेकडो वर्षांपूर्वीचे वैरागचे संतनाथ मंदिर, धामणगावचे बोधले महाराज मंदिर कलाकुसरीचा उत्तम नमुना असून पर्यटकांसाठी उत्कृष्ट स्थळ आहे.

खवय्येगिरीचा थाट

बार्शी शहरात अग्रवाल वडे, पवार ओली भेळ, गुंडाची कोरडी भेळ, शीतलची पुरीभाजी, गुप्ताची पापडी अन्‌ मिरची खवय्यांसाठी मेजवानी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.