श्रावण विशेष : विठ्ठलाबरोबरच महादेवाच्या प्राचीन मंदिरांमध्येही गर्दी

श्रावण विशेष : श्री विठ्ठलाबरोबरच महादेवाच्या प्राचीन मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी
श्रावण विशेष : श्री विठ्ठलाबरोबरच महादेवाच्या प्राचीन मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी
श्रावण विशेष : श्री विठ्ठलाबरोबरच महादेवाच्या प्राचीन मंदिरांमध्येही भाविकांची गर्दीCanva
Updated on
Summary

पंढरपूर तालुक्‍यात कोर्टी, रांझणी तसेच गोपाळपूरजवळील अंतापूर येथील शंभू महादेवाची प्राचीन मंदिरे प्रसिद्ध आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर (Pandharpur, Solapur) तालुक्‍यात कोर्टी (Korti), रांझणी (Ranjhani) तसेच गोपाळपूरजवळील (Gopalpur) अंतापूर (Antapur) येथील शंभू महादेवाची (Mahadev) प्राचीन मंदिरे (Ancient temples) प्रसिद्ध आहेत. श्रावण महिन्यात या तिन्ही ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. प्राचीन काळात कोर्टी गाव शिवक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक येत असतात. शहरातील या विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिराबरोबरच (Vitthal-Rukmini Temple) तालुक्‍यातील अनेक धार्मिक स्थळे (Religious places) आवर्जून पाहण्यासारखी आहेत.

श्रावण विशेष : श्री विठ्ठलाबरोबरच महादेवाच्या प्राचीन मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी
श्रावण विशेष : माळढोक अभयारण्यातील नागनाथ मंदिर ! भक्ती अन्‌ पर्यटनही

पंढरपूर - कराड रस्त्यावर पंढरपूरपासून सात किलोमीटर अंतरावर कोर्टी गाव आहे. रस्त्यालगत शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. तिथे प्राचीन काळात कोटी लिंगार्चन व मोठा यज्ञ झाला होता. त्या यज्ञाच्या होमकुंडातील भस्म तेथील ओढ्याच्या काठी टाकल्याचे सांगितले जाते. दगडी चौथऱ्यावर हे हेमाडपंती मंदिर उभारण्यात आले आहे. सोळा दगडी खांब असलेल्या या मंदिराचे काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरात महादेवाची पिंड असून लगतच्या खोलीत पार्वतीची मूर्ती आणि नागशिल्प आहे. अन्य खोल्यांमध्ये महादेवाच्या लहान पिंडी आहेत. श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीच्या वेळी तिथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. गोपाळपूर - रांझणी रस्त्याच्या बाजूस अंतापूर नावाने ओळखले जाणारे श्री शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. पद्मपुराणामध्ये अंतापूरचा उल्लेख आहे. प्राचीन काळात अंतापूर नावाने गाव अस्तित्वात होते, असे सांगितले जाते. अंतापूर देवालयाचा सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला होता. हे मंदिर आणि परिसर देखील आवर्जून पाहण्यासारखा आहे.

तालुक्‍यातील रांझणी येथे सुद्धा प्राचीन शंभू महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात दर्शनासाठी भाविक नेहमी जात असतात. विधानसभा निवडणुकीच्या वेळी बहुतेक सर्व उमेदवार याच मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करतात. मंदिराच्या पुढे भव्य सभामंडप बांधण्यात आला आहे. तालुक्‍यातील खर्डी येथे श्री सीताराम महाराज तर वाखरी येथे श्री लक्ष्मणदास मंदिर प्रसिद्ध आहे. दर गुरुवारी तिथे भाविक दर्शनासाठी जातात. तालुक्‍यातील भाळवणी येथील श्री शाकंभरी मंदिर देखील मनमोहक आणि नावीन्यपूर्ण आहे.

श्रावण विशेष : श्री विठ्ठलाबरोबरच महादेवाच्या प्राचीन मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी
पाहा, बालाघाट पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान

इस्कॉनने चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर अतिशय रम्य परिसर निर्माण करून येथे मंदिर उभा केले आहे. तिथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अतिशय शांत वातावरणातील या मंदिराला आवर्जून भेट दिली पाहिजे. या मंदिराच्या लगत चंद्रभागा नदीवर भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रभूपाद घाटाची उभारणी करण्यात आली आहे.

तालुक्‍यातील प्रमुख धार्मिक स्थळे

  • खर्डी येथील श्री सीताराम महाराज समाधी मंदिर

  • भाळवणी येथील श्री शाकंबरी देवी मंदिर

  • पखालपूर येथील गणपती मंदिर

  • देगावजवळील संध्यावळी

  • वाखरी येथील श्री लक्ष्मणदास महाराज समाधी मंदिर

  • तालुक्‍यातील पर्यटकांची आकर्षण केंद्रे

  • चंद्रभागा नदी पात्रातील श्री विष्णूपद

  • प्राचीन भव्य दगडी गोपाळपूर मंदिर

  • यमाई तलाव आणि परिसर

  • तुळशी वन उद्यान

  • नदीच्या पैलतीरावरील इस्कॉन मंदिर

  • नदीवरील इस्कॉनचा नवीन प्रभूपाद घाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.