ST Bus News : महिलांसाठी खुशखबर! आता 'इतक्या' रुपयांत घेता येणार अष्टविनायक दर्शन; मार्लेश्वरसाठी स्पेशल बस

ST Bus Offer : महिला प्रवासी वाढल्याने एसटी उत्पन्नही वाढण्यास मदत झाली
Ashtavinayak Darshan ST Bus Scheme
Ashtavinayak Darshan ST Bus Schemeesakal
Updated on
Summary

श्रावणी सोमवारनिमित्ताने प्रवाशांना मार्लेश्वर दर्शनासोबतच तेथील पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

Chiplun News : कोरोना कालावधीपासून दुरावलेले प्रवासी पुन्हा एसटी महामंडळाशी जोडले जावेत, यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. राज्य सरकारने महिलांना (Women) एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर सुमारे २० ते २५ टक्के उत्पन्न वाढण्यास मदत झाली.

आता महिलांनी ग्रुप बुकिंग केल्यास त्यांना ६५५ रुपयात अष्टविनायक दर्शन घेण्याची सुविधा चिपळूण आगाराकडून करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Ashtavinayak Darshan ST Bus Scheme
Good News : आता टपाल खाते विद्यार्थ्यांना देणार 'शिष्यवृती'; Bank Account वर जमा होणार 'इतके' रुपये

मध्यंतरी एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ केलेला संप आणि कोरोना कालावधीमुळे प्रवासी एसटीपासून काही प्रमाणात दुरावले होते. नियमित प्रवास करणाऱ्यांनी स्वतःची खासगी वाहतुकीची व्यवस्था केली होती; मात्र आता अलिकडच्या काळात दुरावलेले प्रवासी पुन्हा एसटीशी जोडले जात आहेत. त्यासाठी नवनवीन योजना प्रवाशांसाठी लागू केल्या जात आहेत.

प्रामुख्याने राज्य सरकारने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर महिलांचा ओघ वाढला आहे. यामुळे खासगी वाहतुकीलादेखील मोठा फटका बसला. महिला प्रवासी वाढल्याने एसटी उत्पन्नही वाढण्यास मदत झाली आहे. अशाच पद्धतीने प्रवाशांची संख्या वाढण्यासाठी चिपळूण आगाराकडून श्रावण महिन्यात दर सोमवारी सकाळी मार्लेश्वर बसफेरी सोडण्यात येणार आहे.

Ashtavinayak Darshan ST Bus Scheme
Ashok Chavan : भाजप नेते म्हणतात आम्ही भिडेंच्या मताशी सहमत नाही, मग कारवाई का करत नाही? अशोक चव्हाणांचा थेट सवाल

मार्लेश्वरसाठी विशेष बस

श्रावणी सोमवारनिमित्ताने प्रवाशांना मार्लेश्वर दर्शनासोबतच तेथील पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. सकाळी ८ वा. ही बस चिपळूण आगारातून सुटणार आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १५० गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. ग्रुप बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.