Statue Of Unity : स्टॅच्यू ऑफ युनिटीमधील या भन्नाट गोष्टी तूम्हाला माहिती आहेत का?

स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी केवळ 33 महिन्यांचा कालावधी लागला
Statue Of Unity :  स्टॅच्यू ऑफ युनिटीमधील या भन्नाट गोष्टी तूम्हाला माहिती आहेत का?
Updated on

भारतातील पहिले उपपंतप्रधान भारत रत्न तसेच आधुनिक भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी समर्पित आहे. ही जगातील सर्वात उंच मूर्ति आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना "भारताचा आयर्न मॅन" म्हणूनही ओळखले जाते. ते स्वातंत्र्यसेनानी, वरिष्ठ नेते आणि भारतीय गणराज्य संस्थापक संस्थापकांपैकी एक होते. भारताच्या गुजरात राज्यातील नर्मदा नदी वर असलेल्या साधू बेटावर हे स्मारक आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं 31 ऑक्टोबर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. जगातील सर्वात मोठा पुतळा राष्ट्राला समर्पित करण्यात आला. तब्बल 182 मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचा लोकार्पण सोहळाही तितकाच भव्य दिव्य करण्यात आला.

Statue Of Unity :  स्टॅच्यू ऑफ युनिटीमधील या भन्नाट गोष्टी तूम्हाला माहिती आहेत का?
Shankh Vastu Tips : देवघरात नक्की कुठे असावा शंख? काय म्हणतात ज्योतिषी

या पुतळ्यासंबंधी काही रोचक गोष्टी आज जाणून घेऊयात

स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी सुमारे 1 लाख 69 हजार गावातील शेतकऱ्यांनी 135 मेट्रिक टन लोखंड दान केले आहे. त्याचा वापर करुन भव्य पुतळा उभारण्यात आला. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 182 मीटर इतकी आहे.

1999मध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी या प्रतिमेचे डिझाईन तयार केले आहे. त्यांनी 50हून अधिक स्मारकांची निर्मिती केली आहे. राम सुतार हे मूळचे महाराष्ट्रातील धुळ्याचे आहेत.

Statue Of Unity :  स्टॅच्यू ऑफ युनिटीमधील या भन्नाट गोष्टी तूम्हाला माहिती आहेत का?
Heritage village : ग्रामिण जीवनाचा आनंद घ्यायचाय मग या हेरीटेज गावांना नक्की भेट द्या!

चीनमधील स्प्रिंग टेंपल येथील बुद्धाची प्रतिमा तयार करण्यासाठी तब्बल 11 वर्ष लागली होती. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी केवळ 33 महिन्यांचा कालावधी लागला आहे.

6.5 रेक्टर स्केलचा भूकंपातही स्टॅच्यू ऑफ युनिटी न डगमगता उभी राहू शकते. ताशी 180 किलोमीटरपर्यंत वाऱ्यांचा वेग झेलू शकते.

Statue Of Unity :  स्टॅच्यू ऑफ युनिटीमधील या भन्नाट गोष्टी तूम्हाला माहिती आहेत का?
Garhkundar Fort Secret : या रहस्यमयी किल्ल्याने गिळंकृत केली लग्नाची वरात; गुप्त खजिन्याचा आहे रखवालदार!

नर्मदा नदीपासून 3.5 किलोमीटर दूर असलेल्या सरदार सरोवरावर  स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आलं आहे.

पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या 153 मीटर उंचीपर्यंत जाता येणार आहे. तर, स्टॅच्यू ऑफ युनिटी 12 किमी लांबीवरुन नजरेस पडते.

Statue Of Unity :  स्टॅच्यू ऑफ युनिटीमधील या भन्नाट गोष्टी तूम्हाला माहिती आहेत का?
Face Care Tips: आलियासारखा चमकदार अन् टवटवीत चेहरा हवा असेल तर करा हा एक उपाय

तेथे पोहचायचं कसं?

वडोदरा विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवरुन केवाडियाला जावे लागेल. हे अंतर 89 किमी आहे. अहमदाबादवरुन जाणाऱ्या पर्यटकांना 200 किमीचा प्रवास करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.