महिलांनो आता बिनधास्त घराबाहेर पडा! हे पाच सेफ्टी ॲप्स तुम्हला देतील सुरक्षा 

t Five useful apps to protect women outside the home
t Five useful apps to protect women outside the home
Updated on

बाहेर दूर कुठेतरी फिरायला जाणे हे जवळपास सर्वांच्या आवडीचा विषय असतो. आपण सर्वजण केव्हा तरी फिरायला जाण्याचे प्लॅन करत असतो. मात्र बऱ्याचदा नव्या ठिकाणी फिरायला जाणे धोकादायक ठरु शकते खासकरुन महिलांसाठी. फिरायला जाताना स्वतःच्या सुरक्षेचा विचार करणे देखील तेवढेच गरजेचे असते. त्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. सध्या मोबाईलमध्ये सरकारी तसेच खासगी कंपन्यांचे असंख्य अॅप महिलांना घराबाहेर सुरक्षित राहण्यासाठी उपयोगी ठरु शकतात. आज आपण अशाच काही खास ॲप बद्दल जाणून घेणार आहोत.

रक्षा ॲप

 हे ॲप खास महिलांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आले आहे. या ॲपच्या मदतीने फक्त एका क्लिकवर तुम्ही निवडलेल्या फोन क्रमांकावर तुमच्या लोकेशनसह धोक्याचा एसएमएस अलर्ट जातो. त्या सोबतच तुम्ही कॉन्टॅक्ट यादीतील असे क्रमांक देखील निवडू शकतात ज्या लोकांना तुमचे लाईव्ह लोकेशन कायम पाहाता येईल. तसेच या ॲपचे खास फिचर म्हणजे हे ॲपबंद पडले किंवा चालत नसेल तरीदेखील वॉल्यूम बटन तीन सेकंद प्रेस केल्यानंतर देखील हा एलर्ट एसएमएस पाठवला जातो. 

वुमेन सेफ्टी

हे ॲप देखील महिलांच्या सुरक्षेसाठी चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला काही धोका जाणवत असेल तर हे ॲप वापरा. याचा वापर अत्यंत सोपा असून यामध्येदेखील फक्त एका क्लिकवर तुम्ही निवडलेल्या फोन क्रमांकाना तुमच्या लोकेशनची पुर्ण माहिती पाठवण्याची सोय दिली आहे. तसेच या ॲपमध्ये तीन रंगाचे बटन्स देण्यात आले आहेत. ज्याद्वारे तुम्ही घटनेची गंभीरता लक्षात घेऊन त्याप्रमाणे अलर्ट संदेश देऊ शकता. एवढेच नाही तर हे ॲप संकटाच्या वेळी ॲटोमॅटीकली फोनच्या दोन्ही कॅमेऱ्याने फोटो कढून ते फोटो ॲपच्या सर्वरला अपलोड देखील करते. 

सेक2सेफ्टी  

वापरण्यास अत्यंत सोपे असे हे ॲप आहे. कसल्याही प्रकारच्या  संकटात सापडलेल्या महिलेने तीचा फोन फक्त जोरात हलवला की  ताबडतोब या ॲपमधून अलर्टचा मॅसेज निवडलेल्या क्रमांकांवर पाठवला जाईल. यात दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही पावर बटन चार वेळा दाबल्यास देखील अलर्ट पाठवला जातो. याची विशेष बाब म्हणजे तुमच्या फोनची स्क्रिन लॉक असेल किंवा इंटरनेट बंद असेल तरी देखील हे ॲप काम करते.

आयवॉच वुमेन 

या ॲपममधून अलर्टचा मॅसेज निवडलेल्या क्रमांकांवर तर जाईलच, सोबतच तुमचा फोन रियल टाईम व्हिडीओ आणि ऑडिओ देखील त्या क्रमांकाना पाठवेल. ॲपच्या दाव्यांनुसार लोकेशनची अचूकता जास्त असून हे जीपीएसला देखील सपोर्ट करते. यातून एका क्लिकच्या मदतीने तुम्ही घरतील सदस्यांना 'आय एम सेफ' बटन क्लिक करुन सुरक्षित असल्याचा निरोप देऊ शकतात. 

'आय एम शक्ती' 

हे ॲप देखील वापरण्यास सोपे आहे. पाच वेळा पावर बटन प्रेस केल्यानंतर दोन सेकंदाच्या आत निवडलेल्या क्रमांकाना अलर्ट पाठवला जातो. तसेच तुमचे लोकेशन बंद असेल तर ते आपोआप ऑन करुन अलर्ट पाठवला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.