तर्री पोहा हे नागपूरचे वैशिष्ट्ये; खवय्यांनो एकदा चला तर

तर्री पोहा हे नागपूरचे वैशिष्ट्ये; खवय्यांनो एकदा चला तर
Updated on

नागपूर : तर्री पोहा हे नागपूरचे वैशिष्ट्ये... सकाळ झाली की कुठल्याही रेस्टॉरंटमधून तर्रीचा सुगंध रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या मोहात पाडतो. परंतु यातही वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधील तर्री व पोह्याचा स्वाद वेगवेगळाच. दक्षिण नागपुरात वैसांकी रेस्टॉरंटमध्ये मात्र अस्सल महाराष्ट्रीय पोहे व त्याला तर्री, चण्याची जोड. त्यामुळे खवय्यांना अगदी घरासारखी लज्जत येथे मिळते.

मानेवाडा रोडवर सिद्धेश्वर हॉलच्या अगदी सामोरासामोर राजकुमार शाहू यांचे वैसांकी स्वीट्‍स व फरसाण आहे. परंतु, या परिसरातीलच नव्हे तर बेसा, रघुजीनगर, अयोध्यानगरातून येथे लोक येतात, तेही तर्री पोहा खायला. सकाळी साडेसहा वाजतापासून राजकुमार शाहू त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत तर्री पोहा तयार करण्यात गुंततात. विशेष म्हणजे घरी तयार केले जाते, अगदी त्याच पद्धतीने राजकुमार शाहू पोहे तयार करतात.

तर्री पोहा हे नागपूरचे वैशिष्ट्ये; खवय्यांनो एकदा चला तर
अमरावती नाव दुर्घटना : गुरुवारी सापडले सात मृतदेह; एकाचा शोध सुरू

तर्री चणा तयार करताना खमंग सुगंध मानेवाडा रोडवरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकालाच या रेस्टॉरंटकडे ओढतो. केवळ तर्री पोह्याची चव चाखल्यानंतरच माणूस पुढे जातो. राजकुमार शाहू यांच्याकडे आलूबोंडा, समोसे, कचोरी आदीही स्वादिष्ट आहे. गरमागरम समोसे दिवसभर असतात. परंतु, राजकुमार शाहू यांच्याकडील तर्री पोहा खाल्ल्याशिवाय अनेकांची सकाळच होत नाही. एवढेच नव्हे त्यांच्याकडील मिठाई सुद्धा खवय्यांना आकर्षित करते.

आता तर सायंकाळी ते चायनीज पण तयार करतात. सकाळी अस्सल महाराष्ट्रीय व्यंजन तर सायंकाळी चायनीज, या दोन्ही वेळी राजकुमार शाहू यांच्याकडील गर्दी चवदार पदार्थांचा पुरावा देते. गर्दीच्या वेळी कर्मचारी आहेतच, परंतु त्यांचा मुलगा वैभवही वडिलांच्या कामात मदत करताना दिसते. खरेदीसाठी राजकुमार शाहू बाहेर गेले की वैभवही ग्राहकांना तर्री पोहा, आलूबोंडा, कचोरी देण्यास मागे पाहत नाही. वडील, मुलगा दोघांचाही ग्राहकांसोबत संवाद अगदी सहज असतो. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्याशिवाय अनेकांच्या दिवसालाच सुरुवात होत नाही.

तर्री पोहा हे नागपूरचे वैशिष्ट्ये; खवय्यांनो एकदा चला तर
देवानंदचा १३५ दिवस मृत्यूशी संघर्ष; धोका टळलेला नाही
सुरुवातीला किराणा दुकान होते. परंतु, पावसाचे पाणी दुकानात शिरत होते. त्यामुळे दरवर्षी मोठे नुकसान सहन करावे लागत होते. अखेर किराणा दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. नवीन रेस्टॉरंट उघडल्यावर भीती होती. परंतु, अस्सल महाराष्ट्रीय पोहे व त्यावर तर्रीने तारले. खवय्यांना अगदी घरची चव मिळावी, यासाठी काळजी घेतली जाते.
- राजकुमार शाहू, संचालक, वैसांकी स्वीट्स व फरसाण, मानेवाडा रोड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()