दिवाळी झालीय त्यामुळे आता एक-एक लग्नही पार पडेल. लग्न तुमच्यापैकी जवळच्याच व्यक्तीचे असेल तर नव्या कपलला गिफ्ट द्यावे लागेल. गिफ्टही असे द्या जे त्यांच्या नेहमीच लक्षात राहील. तुम्ही गिफ्टसाठी हनिमून पॅकेजचा विचार करत असाल. तर स्वस्तात मस्त पॅकेज तुमची वाट पाहत आहे. ही टूर आहे थायलंडची. जी तुम्ही एखाद्याला गिफ्ट देण्याचाही विचार करू शकता.
स्वत: चा हनिमूनही अविस्मरणीय बनवण्यासाठी थायलंडला जाऊ शकता. अलीकडेच थायलंड सरकारने भारतीयांना व्हिसाची गरज नसल्याचे सांगितले आहे. पण तुमच्या मनात हा प्रश्नही येत असेल की व्हिसाचा खर्च वाचल्यानंतर दोन लोकांच्या प्रवासाचा खर्च किती होऊ शकतो? थायलंडमध्ये तुमची हनिमून ट्रिप किती खर्चात होऊ शकते हे आपण पाहुयात.
बँकॉकच्या गजबजलेल्या शहरापासून ते कोह सामुईच्या आश्चर्यकारक समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, थायलंडमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे. परंतु ही संस्कृती आणि निसर्ग सौदर्य थायलंडला खरोखरच स्पेशल बनवते.
थायलंडच्या फ्लाइटची किंमत तुम्ही भारतातील ज्या शहरातून प्रवास करत आहात त्यानुसार बदलते. उदाहरणार्थ, जर तुम्ही कोलकाता ते बँकॉकला उड्डाण केले तर ते तुमच्यासाठी स्वस्त असेल.
दिल्ली, बंगळुरू किंवा हैदराबादला जाण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.
तुम्हाला कोलकाता ते बँकॉकचे 8000 ते 9000 रुपयांचे तिकीट मिळेल.
तुम्हाला दिल्ली ते बँकॉकचे 10,000 ते 15,000 रुपयांचे तिकीट मिळेल.
दोन लोकांसाठी वाहतूक खर्च 35 ते 40 हजार रुपये असेल.
हॉटेल खर्च
थायलंडमधील हॉटेल्स अगदी लो बजेट ते लक्झरी रिसॉर्ट्सपर्यंत आहेत. हनिमून जोडप्यांसाठी येथे स्वस्त हॉटेल्स उपलब्ध असतील. तुम्ही 3 स्टार हॉटेल निवडल्यास, त्याचे भाडे दोन लोकांसाठी 2300 ते 6,700 रुपये प्रति रात्र असेल.
जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्हाला हॉस्टेल, होमस्टे आणि स्थानिक लोकांसोबत रूम शेअर करण्याचा पर्याय देखील मिळेल.
जेवणावरील खर्च
थायलंड हे कोणत्याही खाद्यपदार्थासाठीचे बेस्ट लोकेशन आहे. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे पदार्थ खायला मिळतील. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्हाला स्वस्त आणि चविष्ट पदार्थ सहज मिळतील.
स्ट्रीट फूड खाऊन तुम्ही थायलंडमध्ये तुमची ट्रिपही पूर्ण करू शकता. येथील स्ट्रीट फूड तुमचे मन जिंकेल. इथे जेवणाची किंमत 1500-2000 रुपये असेल. हा तुमचा एका दिवसाचा खर्च आहे.
कॅबची किंमत येथे आहे
लोकल ट्रान्सपोर्टसाठी तुम्हाला 350-750 रुपये मोजावे लागतील. याशिवाय, तुम्ही बस, ट्रेन आणि कॅब वापरू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.