Best Hillstaions : बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा आहे? मग, उत्तराखंडच्या ‘या’ बेस्ट ठिकाणांची करा निवड

हिवाळ्यात उत्तराखंडमधील बर्फाच्छादित परिसराचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक गर्दी करतात.
Best Hillstaions
Best Hillstaionsesakal
Updated on

Best Hillstaions : उत्तराखंड या राज्याला 'देवभूमी' म्हणून खास ओळखले जाते. देवभूमीचे सौंदर्य हे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळ्यातही खुलून दिसते. त्यामुळे, कोणताही ऋतू असुद्या या उत्तराखंड राज्यात पर्यटकांची नेहमीच रेलचेल पहायला मिळते.

उन्हाळ्यात ज्या प्रकारे लोक इथे थंडावा मिळावा म्हणून येतात, अगदी त्याचप्रमाणे हिवाळ्यात उत्तराखंडमधील बर्फाच्छादित पर्वतांचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. त्यामुळे, खास हिलस्टेशन्ससाठी पर्यटकांची उत्तराखंडला पसंती असते.

या हिवाळ्यात जर तुम्ही देखील फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर उत्तराखंडमधील हिलस्टेशन्सची निवड करायला काही हरकत नाही. आज आम्ही तेथील प्रसिद्ध हिलस्टेशन्स बद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

Best Hillstaions
Winter Tourism : डिसेंबरमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? मग, 'या' बजेटफ्रेंडली ठिकाणांचा करा विचार

धनोल्टी हिल स्टेशन

धनोल्टी हे ठिकाण उंच हिमालयाच्या मधोमध वसलेले एक सुंदर हिलस्टेशन आहे. हा शांत आणि पर्वतीय प्रदेश पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या परिसरात किल्ले, मंदिरे आणि विविध पर्यटनस्थळे आहेत.

तसेच, जर तुम्हाला कॅंम्पिंग आणि साहसी खेळ आवडत असतील तर तुम्ही धनोल्टी या हिलस्टेशनला भेट द्यायला काही हरकत नाही. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम आहे, यात काही शंका नाही.

औली हिल स्टेशन

उत्तराखंड राज्यातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय हिल स्टेशन म्हणून या औलीचा उल्लेख केला जातो. या हिल स्टेशनवरील मनमोहक बर्फवर्षाव हा पाहण्यासारखा असतो.

डिसेंबर महिन्यात अनेकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे भेट देतात. स्नोबोर्डिंग आणि स्कीइंगसाठी हे ठिकाण बेस्ट आहे.

पर्वत खोऱ्यांमध्ये वसलेल्या या ठिकाणाचा सुंदर नजारा डोळ्यांत साठवण्यासाठी तुम्ही देखील या पर्यटन स्थळाचा विचार करू शकता.

खिर्सू

उत्तराखंड राज्यातील हे आणखी एक सुंदर हिलस्टेशन आहे. हे हिल स्टेशन उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यामध्ये स्थित आहे. खिर्सू हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 17000 मीटर उंचीवर असल्यामुळे येथून तुम्ही हिमवर्षावाचा सुंदर नजारा पाहू शकता.

डिसेंबर महिन्यात येथे बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात. बर्फवृष्टीसोबतच येथे तुम्ही साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता.

Best Hillstaions
Career in Tourism: जगभरात फिरा आणि सोबत पैसेही कमवा; 12वीनंतर टुरिझम इंडस्ट्रीमध्ये असं करा करिअर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.