Travel Diaries : मार्चमध्ये लाँग ट्रीपवर जाण्याचा प्लॅन करताय? मग, 'या' भन्नाट ठिकाणांना नक्की द्या भेट

Travel Diaries : मूड रिफ्रेश करण्यासाठी आणि स्वत:ला चार्ज करण्यासाठी फिरायला जाणे, हा एक बेस्ट ऑप्शन आहे. हवामानानुसार मार्च महिना हा प्रवासासाठी सर्वात उत्तम काळ आहे.
Travel Diaries
Travel Diariesesakal
Updated on

Travel Diaries : रोजची सकाळची कामावर जाण्याची गडबड आणि आठवड्याचे नेहमीचे तेच रूटीन, या सगळ्या गोष्टींमुळे ताण-तणाव आणि थकवा येण्याची शक्यता असते. या बोरींग रूटीनला अनेक जण कंटाळलेले असतात.

सकाळपासून ते रात्रीपर्यंत ऑफिस आणि घराचे तेच कंटाळवणे वेळापत्रक अनेकदा आपले मानसिक आरोग्य बिघडवते. त्यामुळे, या व्यस्त जीवनात कुठेतरी स्वत:ला चार्ज करत राहणे, खूप महत्वाचे आहे.

मूड रिफ्रेश करण्यासाठी आणि स्वत:ला चार्ज करण्यासाठी फिरायला जाणे, हा एक बेस्ट ऑप्शन आहे. हवामानानुसार मार्च महिना हा प्रवासासाठी सर्वात उत्तम काळ आहे. या मार्च महिन्यात जर तुम्ही देखील तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत किंवा एकटे कुठे फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असाल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. आज आम्ही तुम्हाला देशातील काही अप्रतिम ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जी मार्चमध्ये फिरण्यासाठी सर्वोत्तम आहेत. (best places to visit in march)

Travel Diaries
Dwarka Travel : द्वारकेच्या आजूबाजूला असलेल्या 'या' समुद्रकिनाऱ्यांसमोर गोवा देखील पडेल फिका, एकदा नक्की द्या भेट

दार्जिलिंग

पश्चिम बंगालमधील सुप्रसिद्ध शहर म्हणून दार्जिलिंगची खास ओळख आहे. यासोबतच येथील चहाचे मळे, उंच पर्वत आणि चहूबाजूंनी हिरवळीने नटलेला परिसर हे येथील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

दार्जिलिंग हे शहर उंच टेकड्यांनी वेढले आहे. यासोबतच येथील बटासिया गार्डन, कांचनजंगा व्ह्यू पॉईंट, तेनझिंग रॉक आणि घूम रेल्वे स्टेशन इत्यादी येथील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. यासोबतच येथील टॉय ट्रेनचा प्रवास ही प्रसिद्ध आहे. येथे गेल्यानंतर या सर्व ठिकाणांना भेट अवश्य द्या. (Darjeeling)

रणथंबोर

राजस्थान या राज्यातील सुप्रसिद्ध अभयारण्य म्हणजे रणथंबोर अभयारण्य होय. देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. वन्यजीव प्रेमींसाठी तर हे अभयारण्य एक उत्तम ठिकाण आहे. या अभयारण्याला तुम्ही तुमच्या जोडीदारासह, कुटुंबासह, मित्र-मैत्रिणींसोबत किंवा अगदी एकटे ही भेट देऊ शकता.

मार्च महिन्यात जर तुम्ही रणथंबोर अभयारण्याला भेट दिली तर या दिवसांमध्ये रॉयल टायगर्स दिसण्याची शक्यता वाढते. त्यामुळे, तुम्हाला ही कदाचित या वाघाचे दर्शन घडू शकते. (Ranthambore national park)

Travel Diaries
South India Travel : स्वर्गाहून सुंदर आहेत दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणे, मार्चमध्ये करा फिरायला जाण्याचा प्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.