Travel Diaries : मार्च हा वर्षाचा असा महिना असतो की, ज्या महिन्यात उन्हाळ्याला सुरूवात होते. या महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये सौम्य उष्णता जाणवू लागते. अनेक जण या महिन्यात फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात.
आता अवघ्या काही दिवसांवर मार्च महिना येऊन ठेपला आहे. जर तुम्ही या मार्च महिन्यात तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा पार्टनरसोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर देशातील काही सुंदर ठिकाणांना तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.
मार्चमध्ये तुम्ही तुमच्या मित्र-मंडळींसोबत, पार्टनरसोबत किंवा कुटुंबासोबत दक्षिण भारतात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हंपी त्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश असलेले हंपी हे ठिकाण फिरण्यासाठी एकदम परफेक्ट आहे.
या परिसरातील पुरातन मंदिरे, टेकड्या आणि निसर्ग खरच पाहण्यासारखा आहे. हंपी शहरात तुम्ही नाईटलाईफ देखील एंजॉय करू शकता. येथील डोंगर आणि दऱ्यांमध्ये वसलेले हंपी तुमचे लक्ष वेधून घेते. हंपीमध्ये गेल्यावर तुम्ही विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर, क्विन्स बाथ, मातंग हिल्स आणि लोटस पॅलेस इत्यादी अनेक ठिकाणे पाहू शकता.
गोवा हे भारतातील असे राज्य आहे, जे तेथील पर्यटनासाठी जास्त प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे आणि निसर्ग तुम्हाला भुरळ घालतो. या ठिकाणी दरवर्षी देश-विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात.
येथील समुद्रकिनारे आणि नाईटलाईफचा तुम्ही मनमुरादपणे आनंद घेऊ शकता. समुद्रकिनाऱ्यांसोबत गोव्यामधील मंदिरे, चर्च आणि समुद्री किल्ल्यांना ही तुम्ही भेट देऊ शकता. यासोबतच दूधसागर धबधबा, अंजुना बीच, वागेतोर बीच आणि बॅसिलिका ऑफ बॉम जीझस इत्यादी उत्तम ठिकाणे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता.
'योगनगरी' म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे ऋषिकेश होय. हे ठिकाण उत्तराखंड राज्यात स्थित असून हे एक सुंदर हिलस्टेशन आहे. या ठिकाणी देखील दरवर्षी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. येथील उंच पर्वत, तलाव-धबधबे, घनदाट जंगले आणि गंगा नदी ऋषिकेशच्या सौंदर्यात आणखी भर घालतात.
तुमच्या पार्टनरसोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथील पर्वतांमधील कॅम्प हाऊसमध्ये तुम्ही संगीताच्या तालावर मजामस्ती करू शकता आणि येथील पर्यटन स्थळे एक्सप्लोअर करू शकता. यासोबतच रिव्हर राफ्टिंग आणि ट्रेकिंगचा ही आनंद तुम्ही घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.