Travel Tips : प्रवास करणे हा खरं तर एक रोमांचकारी अनुभव आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाता तेव्हा तेथील अनेक गोष्टी एक्सप्लोअर करता. तेथील ठिकाणे, पर्यटन स्थळे आणि तेथील खाद्यसंस्कृती या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करता. हे सर्व करताना आपल्याला फिरण्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असतो, आणि हे योग्य देखील आहे.
मात्र, या दरम्यान आपण आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो. फिरायला गेल्यावर आपण मौज-मजा करताना इतके दंग होतो की, आपण आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाही. या दरम्यान अनहेल्दी फूड देखील खाल्ले जाते.
ज्यामुळे, आरोग्याची हानी तर होतेच शिवाय आपले पैसे देखील खर्च होतात. त्यामुळे, प्रवास करताना शक्यतो निरोगी अन्न खाण्याचा प्रयत्न करा आणि काही गोष्टींची काळजी घ्या. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.
जेव्हा आपण कुठेतरी फिरायला जातो, तेव्हा त्यावेळी आपल्या पचनक्षमतेवर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये हर्बल टी खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे, प्रवासादरम्यान हर्बल टी जरूर प्या. तुम्ही तुमच्या सोबत हर्बल टी चे काही पॅकेट्स देखील सोबत ठेवू शकता. जेणेकरून तुमचे शरीर देखील डिटॉक्स ठेवण्यास मदत होईल.
प्रवास करताना थकव्यामुळे जास्त भूक लागू शकते. त्यामुळे, या कारणामुळे काही जण जंक फूड खातात. परंतु, असे करू नका. त्याऐवजी तुम्ही प्रवास करताना सोबत हेल्दी स्नॅक्स सोबत ठेवा. जेणेकरून तुमची भूक भागेल आणि तुमच्या आरोग्याला कोणतीही हानी होणार नाही. या हेल्दी स्नॅक्समध्ये तुम्ही डार्क चॉकलेट, ड्रायफ्रूट्स किंवा कोणतीही फळे सोबत ठेवू शकता.
जेव्हा आपण प्रवास करतो, तेव्हा अनेकदा आपले शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे, अशक्तपणा किंवा चक्कर येण्याची शक्यता निर्माण होते. शरीरातील या पाण्याच्या कमतरतेमुळे हा त्रास संभवतो. त्यामुळे, प्रवास करताना पाण्याची बॉटल सोबत ठेवायला अजिबात विसरू नका. जेणेकरून तुम्ही स्वत:ला हायड्रेटेड ठेवू शकाल आणि कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.