MP Forts Travel : फक्त महाराष्ट्रातच नाही तर MP मध्ये देखील आहे मराठा साम्राज्यातील किल्ले, नक्की भेट द्या

Historical Forts of Madhya Pradesh: भारतातील प्रत्येक राज्यात आपल्याला स्थापत्यकलेची आणि कारागिरीची अनेक सुंदर उदाहरणे पहायला मिळतात. मध्यप्रदेश या राज्यात अनेक ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत.
MP Forts Travel
MP Forts Travelesakal
Updated on

Travel Diaries : भारत हा देश विविध परंपरांनी आणि संस्कृतींनी नटलेला आहे. त्यामुळे, आपल्या देशातील प्रत्येक राज्याचे खास असे वैशिष्ट्य आहे. या सर्व गोष्टींमुळेच आपला देश जगभरात ओळखला जातो. भारतातील प्रत्येक राज्याची स्वत:ची वेगळी देहबोली, वस्त्र, आणि खाद्यसंस्कृतीची अनोखी परंपरा आहे.

यासोबतच प्रत्येक राज्यात आपल्याला स्थापत्यकलेची आणि कारागिरीची अनेक सुंदर उदाहरणे पहायला मिळतात. भारतातील मध्यप्रदेश या राज्यात अनेक ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत. या स्थळांमध्ये काही किल्ल्यांचा देखील समावेश आहे. मध्यप्रदेशातील हे किल्ले उत्कृष्ट कारागिरीची उत्तम उदाहरणे आहेत.

या हिवाळ्यात जर तुम्ही मध्यप्रदेशला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तिथल्या या सुंदर किल्ल्यांना भेट द्यायला विसरू नका. कोणते आहेत हे सुप्रसिद्ध किल्ले? चला तर मग जाणून घेऊयात.

MP Forts Travel
Andaman Tour Package : मार्चमध्ये अंदमानला फिरायला जाण्याचा करा प्लॅन, IRCTC घेऊन आलय तगडं पॅकेज

ग्वाल्हेर किल्ला

मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ नंतर ग्वाल्हेर हे शहर या राज्यातील सर्वात महत्वाचे असलेले शहर आहे. या शहराला देखील सुंदर इतिहास लाभला आहे. या शहरातच हा सुप्रसिद्ध ग्वाल्हेर किल्ला आहे. (Gwalior Fort)

हा किल्ला भारतातील किल्ल्यांपैकी सर्वात सुंदर असलेला किल्ला आहे. या किल्ल्याची कारागिरी अतिशय कोरीव आणि सुंदर असल्यामुळे अनेक देशी-विदेशी पर्यटक या किल्ल्याला आवर्जून भेट देतात. विशेष म्हणजे हा किल्ला मान मंदिर आणि गुजरी महाल या दोन भव्य महालांनी वेढलेला आहे.

महेश्वर किल्ला

मध्यप्रदेश या राज्यातील खरगोन जिल्ह्याजवळ असलेला हा किल्ला महाराणी अहिल्यादेवी होळकरांचा किल्ला म्हणून ही ओळखला जातो. हा किल्ला नर्मदा या पवित्र नदीच्या टेकडीवर वसलेला आहे. या किल्ल्याची सुंदर आणि गुंतागुंतीची रचना, पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. येथील धबधबे, रंगीबेरंगी बोटींमुळे पर्यटक या ठिकाणी नेहमीच गर्दी करतात. तुम्ही जर मध्यप्रदेशला जाण्याचा विचार करत असाल तर, या ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका. (Maheshwar Fort)

मांडू किल्ला

मध्यप्रदेशातील मांडू किल्ला हा या राज्यातील सर्वात सुप्रसिद्ध आणि मोठा किल्ला आहे. या किल्ल्याची स्थापना राजा भोजने केली होती. या किल्ल्यावरील किचकट मात्र, तितकेच सुंदर असलेले हे कोरिव काम लोकांना आकर्षित करत आहे. या किल्ल्याचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती जाणून घ्यायची असेल, तर या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या. (Mandu Fort)

MP Forts Travel
Travel Diaries : कडाक्याच्या थंडीपासून दूर जाण्यासाठी भारतातल्या 'या' ठिकाणांना नक्की द्या भेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.