Diwali 2024 : कुठे अभ्यंगस्नान तर कुठे सार्वजनिक सुट्टी, जगभरात अशी साजरी होते दिवाळी

तुम्हाला माहिती आहे का, हा सण केवळ भारतातच नाही तर इतरही अनेक ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जाणून घेऊया ही कोणती ठिकाणे आहेत.
Diwali 2024
Diwali 2024esakal
Updated on

These Countries Also Celebrate Diwali Festival  

दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळीला सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतं. दिवाळीला आपल्या देशात विशेष महत्त्व आहे. कारण, पौराणिक कथा अन् घटनांमध्ये दिवाळीचे महत्त्व सांगितले गेले आहे.

भारतीयांची संस्कृती देशभरात नावजली जाते. कारण, आपल्या भारतीयांचा गाभा हा आपल्या संस्कृतीत आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकही भारताकडे कूच करतात. आपले सण-परंपरा परदेशातही वेगवेगळ्या पद्धतीने पाळले जातात.  

तुम्हाला माहिती आहे का, हा सण केवळ भारतातच नाही तर इतरही अनेक ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जाणून घेऊया ही कोणती ठिकाणे आहेत. (Diwali 2024)

Diwali 2024
Diwali 2024: दिवाळीत झाडू, पणत्यासह 'या' वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ

यंदा दिवाळी कधी आहे?

कॅलेंडरनुसार, कार्तिक अमावस्या ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.५२ वाजता सुरू होत आहे. ही तारीख १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.१६ वाजता संपेल.  कार्तिक अमावस्या शुक्रवार, १ नोव्हेंबर रोजी आहे. अमावस्या तिथीला प्रदोष व्यापिनी मुहूर्तावर दिवाळी पूजन करण्याचे शास्त्रानुसार आहे.

फिजी

फिजीमध्ये अनेक भारतीय राहतात आणि म्हणूनच दिवाळीचा सण येथे मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी दरम्यान तिथे सार्वजनिक सुट्टीही असते. येथे लोक या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देतात, दिवाळीची छोटी पार्टीही आयोजित करतात. या दिवशी तिथल्या शाळा आणि महाविद्यालये देखील बंद असतात.

Diwali 2024
Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

इंडोनेशिया

दिवाळी इंडोनेशियामध्येही मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की येथे भारतीय लोकसंख्या तितकी नाही. पण दिवाळीला होणारे सर्व विधीही इथेच केले जातात.

सिंगापूर

भारतात दिवाळीचा उत्साह अनेक दिवस आधीच सुरू होतो. आणि सणानंतरही अनेक दिवस सुरू राहतो. सिंगापूरमध्येही तुम्हाला भारतासारखेच वातावरण पाहायला मिळेल. कारण भारतानंतर ज्या ठिकाणी दिवाळीची भव्यता सर्वाधिक दिसते ते सिंगापूर. येथे तुम्हाला गृह सजावटीपासून रांगोळी आणि दिव्यांच्या मिणमिणत्या गोष्टींपर्यंत सर्व काही दिसेल.

युनायटेड किंगडम

युनायटेड किंगडममधील अनेक शहरांमध्ये तुम्हाला दिवाळीचा झगमगाट दिसेल. इथे तुम्हाला बर्मिंगहॅम आणि लीसेस्टरमध्ये दिवाळीची अधिक भव्यता दिसेल. तिथे असलेला भारतीय समुदाय हा सण साजरा करतात.

कॅनडा

कॅनडामध्ये तुम्हाला भारतातून पंजाबी समुदायाचे लोक मोठ्या संख्येने दिसतील. हेच कारण आहे की, इथे तुम्हाला अनेक दिवाळी आणि इतर भारतीय सण साजरे करताना दिसतील. कॅनडा या देशाला अनौपचारिकपणे 'मिनी पंजाब' म्हणूनही ओळखले जाते.

Diwali 2024
Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

श्रीलंका

भारतीय आणि हिंदू पौराणिक कथांमध्ये श्रीलंकेचा खूप उल्लेख आहे. कारण रावण हा लंकेचा राजा होता आणि तो सीतेला लंकेत घेऊन गेला होता. त्यानंतर बजरंगबलीने आपल्या शेपटीच्या आगीने संपूर्ण लंका जाळून टाकली. त्यानंतर प्रभू श्रीरामांनी लंकाधिपती रावणाचा वध केला. या देशात भारतीय संस्कृतीचा पगडा दिसून येते. त्यामुळे येथे दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

नेपाळ

नेपाळमध्ये अनेक भारतीय सण साजरे केले जातात, म्हणून दिवाळी देखील मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. नेपाळ हे भारताच्या सीमेवर वसलेले आहे, त्यामुळेच दिवाळीच्या दिवशी नेपाळमध्ये भारतासारखीच शैली आणि वातावरण पाहायला मिळते.

Diwali 2024
Diwali Recipe : दिवाळीची स्वच्छता करताना काही रहायला नकोय, तुम्ही घरातील या ठिकाणांची स्वच्छता केली का?

मलेशिया

दिवाळीला हिरवी दिवाळी म्हणतात हे तुम्हाला क्वचितच माहित असेल आणि दिवाळीच्या दिवशी येथील वातावरण भारतासारखेच असते. येथे लोक दिवसाची सुरुवात अभ्यंगस्नान करून करतात. यानंतर ते मंदिरात किंवा घरात पूजा करतात. येथे फटाक्यांवर बंदी असल्याने लोक एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.