Kolhapur Travel : रांगड्या मातीचं आपलं कोल्हापूर पाहायचंय? ही ठिकाणे मिस करू नका

कोल्हापुरातील 'हे' ठिकाणं एकदा तरी पाहाचं...
Kolhapur Travel
Kolhapur Travelesakal
Updated on

कोल्हापूर म्हंटल की तांबडा-पांढरा रस्सा आणि झणझणीत मिसळ आपल्याला आठवते. कोल्हापूरला येणारा प्रत्येक पर्यटक याची चव चाखल्याशिवाय राहत नाही. याचबरोबर कोल्हापूर हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर कोल्हापूरमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत.

पन्हाळा

कोल्हापूरच्या आजूबाजूला असलेल्या सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध हिल स्टेशन्सचा विचार केला तर पन्हाळगडाचे नाव नक्कीच येते. पन्हाळगड हे कोल्हापूरच्या पर्यटन स्थळांच्या यादीतील एक सर्वात प्रसिद्ध नाव आहे. डोंगरावर वसलेला पन्हाळा किल्ला आणि मुळातच थंड हवेचे ठिकाण असलेल्या या पर्यटनस्थळी पर्यटकांना बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.

Kolhapur Travel
Maharashtra Tourist Places : निसर्गरम्य किनारे अन् हिरवीगार वने.. नेचर लव्हर्सना फिरण्यासाठी बेस्ट आहेत रत्नागिरीमधील ही ठिकाणं

श्री अंबाबाई मंदिर

कोल्हापुरात आलेला प्रत्येक पर्यटक अंबाबाई चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नाही. अंबाबाई मंदिर ज्याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते. हे कोल्हापुरातील सर्वाधिक आकर्षण आणि सुंदज पर्यटन स्थळ आहे.

जोतिबा मंदिर

कोल्हापूर शहराच्या वायव्ये दिशेस जेमतेम १५ किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. येथे बारा ज्योतिर्लिंग आहेत. जवळच यमाई मंदिर आहे. महाराष्ट्र आणि बाहेरून कित्येक जोतिबा भक्त या ठिकाणाला आवर्जून भेट देत असतात.

कोल्हापूर वस्तूसंग्रहालय

कोल्हापूर हे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर आहे. यासंदर्भातील अतिशय उत्तम माहितीचे भांडार म्हणजेच कोल्हापूर शहरातील टाऊन हॉल म्युझियम अर्थात कोल्हापूर वस्तुसंग्रहालय होय. या वस्तुसंग्रहालयामध्ये जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वीच्या कोल्हापूरचा इतिहास उलगडणाऱ्या अनेक गोष्टी पाहता येतात.

रंकाळा तलाव

कोल्हापूर म्हटलं की रंकाळा हे बऱ्याच जणांना ठाऊक आहे. त्यामुळेच अंबाबाई मंदिराच्या अगदी जवळ असणारा रंकाळा तलाव हे ठिकाण पर्यटकांच्या यादीतील महत्त्वाचे नाव असते.

न्यू पॅलेस

न्यू पॅलेस संग्रहालय कोल्हापुरातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे.

विशाळगड

कोल्हापुरपासून ९० किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला असून गडाच्या चारहीबाजूने मोठे खंदक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.