डिसेंबर महिन्यात अनेकजण मोठी सुट्टी काढून फिरण्याचा प्लॅन करतात. दरवर्षी कुठे जायचं असा विचार करत असाल तर सध्याचे ओमिक्रॉनचे संकट बघता तुम्ही रोड ट्रिप ला जाण्याचा विचार नक्की करा. कारण तुम्हाला यासाठी सार्वजनिक वाहनाने प्रवास करावा लागणार नाही. स्वत:ची गाडी घेऊन निघा. थंडीत तुम्हाला अशी चांगली चांगली ठिकाणं सापडतील जिथे तुम्ही रोड ट्रीपला जाऊ शकता. डिसेंबरमध्ये तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट द्या.
मुंबई ते गोवा
दिल चाहता है चित्रपटासारखा अनुभव घ्यायचा असेल तर ही ट्रीप मस्त आहे. डिसेंबरमधला सिझन इथे जाण्यासाठी परफेक्ट आहे. वर्षाच्या शेवटी लोकांमध्ये असणारा उत्साह तुम्ही इथे अनुभवू शकता. इथे जाण्यासाठी १३ तास लागतात. पण इथले समुद्रकिनारे पाहून तुम्ही तुमचा थकवा विसरता.
बंगलोर ते कुर्ग
बंगलोर तरूणाईचं अत्यंत आवडीचं ठिकाण आहे. तेथील वातावरण अतिशय चांगले असते. पण कुर्गमधली मजा काही औरच असते. बंगलोर ते कुर्ग अंतर ७ तासांचे आहे. इथे जाण्याचा रस्ता अतिशय सुंदर आहे. त्यामुळे हा प्रवास तुमच्या कायम लक्षात राहील.
दिल्ली ते जयपूर
रोड ट्रिपला जाण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणजे दिल्ली ते जयपूर. दिल्ली ते जयपूर अंतर ६ तासांचे आहे. पण मुंबई ते दिल्ली किंवा पुणे ते दिल्ली अंतर जास्त आहे. त्यामुळे ज्यांना ड्रायव्हिंग आवडतं आणि येतं अशांसोबत गेल्यास जास्त मजा येईल. जयपुरमध्ये तुम्हाला खूप चांगली लोकेशन्स एक्सप्लोर करता येतील.
विशाखापट्टणम ते अराकू घाटी
अराकू घाटातून प्रवास करणे तुम्हाला आवडेल. दक्षिण भारतात फिरायचे असेल तर ही सगळ्यात सुंदर जागा आहे. विझागची ही रोड ट्रिप खूप खास ठरू शकते. रोड ट्रिप सकाळी लवकर सुरू करा जेणेकरून तुम्ही सूर्योदय पाहू शकता. येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला सुमारे ४ तास लागतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.