Tirupati Balaji Travel : तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाण्याचा प्लॅन करताय? मग, ‘या’ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

Tirupati Balaji Travel : तिरूपती बालाजी मंदिरापासून जवळच्या अंतरावर काही इतर प्रेक्षणीय स्थळे आहेत.
Tirupati Balaji Travel
Tirupati Balaji Travelesakal
Updated on

Tirupati Balaji Travel : उन्हाची तीव्रता आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एप्रिल महिन्यामध्ये लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील लागतात. त्यामुळे, अनेक जण या दिवसांमध्ये फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात. काही जण कुटुंबासोबत तिरूपती बालाजीला २ दिवसांसाठी जातात. बालाजीचे दर्शन घेऊन लगेच माघारी फिरतात.

परंतु, तुम्हाला माहित आहे का? की, या तिरूपतीपासून जवळच्या अंतरावर काही इतर प्रेक्षणीय स्थळे आहेत. जी तुम्ही नक्कीच एक्सप्लोअर करू शकता. अनेकांना ही ठिकाणेच माहित नसल्यामुळे, ते केवळ तिरूपतीचे दर्शन घेऊन माघारी घरी येतात.

आज आम्ही तुम्हाला तिरूपतीजवळ असणाऱ्या काही उत्तम ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ही ठिकाणे तुम्ही २ दिवसांच्या ट्रीपमध्ये सहज फिरू शकता. तिरूपतीचे दर्शन घेण्यासोबतच तुम्ही या ठिकाणांना ही भेट देऊ शकता आणि तुमची ट्रीप अविस्मरणीय बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या ठिकाणांबद्दल.

Tirupati Balaji Travel
Maharashtra Travel : थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले..! महाराष्ट्रातल्या ‘या’ समुद्रकिनाऱ्यांची बातच न्यारी, कुटुंबासोबत नक्की भेट द्या

श्रीकालहस्ती मंदिर

तिरूपती बालाजीचे मंदिर आंध्रप्रदेशमध्ये स्थित आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी तुम्ही जाणार असाल तर तेथून जवळच असणाऱ्या श्रीकालहस्ती मंदिराला अवश्य भेट द्या. हे श्रीकालहस्ती मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे.

विशेष म्हणजे दक्षिण भारतातील ऐतिहासिक मंदिर म्हणून या मंदिराची खास ओळख आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरूपती शहराजवळ हे मंदिर स्थित आहे. तिरूपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर, तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता.

तिरूपती बालाजी ते श्रीकालहस्ती मंदिर हे अंतर ३७.२ किमी एवढे आहे. केवळ १ ते दीड तासात तुम्ही या ठिकाणी पोहचू शकता. सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुले असते. त्यामुळे, या कालावधीमध्ये तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. (Srikalahasti temple)

श्री वेंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान

तिरूपती बालाजी मंदिरापासून अगदी जवळ असलेले हे श्री वेंकटेश्वर राष्ट्रीय उदयान पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. हे राष्ट्रीय उद्यान अंदाजे ३५४ चौरस किमीमध्ये पसरले आहे. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे वन्यजीव, कीटक, वनस्पती पहायला मिळतील. शिवाय, या ठिकाणी तुम्ही जंगल सफारीचा ही आनंद घेऊ शकता.

तिरूपती बालाजी ते श्री वेंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान दरम्यानचे अंतर केवळ ८ किमी आहे. तुम्ही केवळ २०-२५ मिनिटांमध्ये येथे पोहचू शकता. सकाळी ८:३० ते सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत हे उद्यान पर्यटकांसाठी खुले असेल. (Sri Venkateshwara National Park)

Tirupati Balaji Travel
Summer Travel : ट्रिप अशी प्लॅन करा जिथं बच्चेकंपनीलाही येईल मजा,'या' ठिकाणांचा लिस्टमध्ये करा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.