Tour to Amboli : थंड हवेच्या ठिकाणांची राणी! पर्यटनाला इथे जाल तर फक्त निसर्ग अन् तुम्ही एवढच दिसेल

सावंतवाडीमध्ये वसलेलं आंबोली हे ठिकाण भरपूर निसर्गरम्य
Tour to Amboli
Tour to Amboli esakal
Updated on

Tour to Amboli : महाराष्ट्रात अनेक थंड हवेची ठिकाणं आहेत, विकेंड म्हटला की सगळ्यांनाच कुठे ना कुठे बाहेर फिरायला जायचं असतं. असच एक थंड हवेचं ठिकाण म्हणजे आंबोली. सावंतवाडी मध्ये वसलेलं आंबोली हे ठिकाण भरपूर निसर्गरम्य आश्चर्याने भरलेलं आहे. समुद्र सपाटीपासून 690 मीटर उंचावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे ठिकाण आहे. संपूर्ण डोंगराळ प्रदेश, आजूबाजूने धबधबा आणि हिरवागार परिसर. यामुळे या ठिकाणाला थंड हवेच्या ठिकाणची राणी असं आंबोलीला म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

Tour to Amboli
Tour Near Goa : गोव्याला जायचं प्लॅन करताय? त्याआधी वाटेतल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

शांत आणि निसर्गरम्य अशा आंबोलीच्या परिसरात नैसर्गिक साधनसंपत्तीची भरभराट पाहायला मिळतो. पर्यटकांनी वर्षातल्या कोणत्याही ऋतूमध्ये भेट द्याव असे हे ठिकाण आहे. उंचावरून पडणारे धबधबे आंबोलीच्या सौंदर्यात अजूनच भर घालत असतात.हा सगळा परिसर अगदी घनदाट अरण्याचा आहे आणि तिथे आपल्याला बरेच धबधबे पाहायला मिळतात. पावसाळ्यात होणारा प्रचंड पाऊस इथल्या सगळ्या डोंगरांना हिरवागर्द शालू नेसवतो.

Tour to Amboli
Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

इंग्रज राज्यकर्ते या ठिकाणाच्या प्रेमात पडले होते आणि कर्नल वेस्ट्रॉप यांनी आंबोलीला गिरिस्थानाचा दर्जा मिळण्यासाठी खूपच मेहनत घेतली. इथली नागरतास धबधबा, हिरण्यकेशी, सी व्ह्यू पॉईंट, महादेवगड ही ठिकाणे पर्यटकांनी कायमच गजबजलेली असतात.

Tour to Amboli
Tandalachi Kheer Recipe: सोमप्रदोषा निमित्त बनवा खास तांदळाची खीर, महादेवांना दाखवा नैवेद्य

राहण्याची आणि खाण्याची सोय

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहासोबत इथे इतरही अनेक हॉटेल्स आहेत. राहण्याबरोबरच खाण्याची सोय सुद्धा फार छान केलेली आहे.

हिरण्यकेशीचा उगम

इथे हिरण्यकेशी नदीचा उगम आहे. तिथपर्यंत जाण्याचा रस्ता काहीसा कच्चा आहे पण तिथे गेल्यावर दिसणारे निसर्गाचे रूप केवळ अवर्णनीय. तिथे पार्वतीचे एक छोटेसे देऊळ असून हिरण्यकेशी नदी इथल्याच डोंगरातून उगम पावते. हिरण्यकेशी नदी इथून पुढे कर्नाटकातून वाहत जाते आणि तिथे तिला घटप्रभा हे नाव मिळाले आहे.

Tour to Amboli
Garlic Bread Sticks Recipe : काहीतरी मजेशीर खावस वाटत आहे? मग ट्राय करा, गार्लिक ब्रेड स्टिक्स

जैवविविधतेने भरलेला परिसर

वनस्पती, फुले, फळे आणि प्राणिजीवन यांनी आंबोली अगदी समृद्ध आहे. रानडुकरे, बिबटे, चितळ, सांबर, भेकर, अस्वल, माकडं असं वन्यजीवन इथे दिसतात. सदाहरित जंगलात मैना, बुलबुल, धनेश, धोबी, चांदोल, राघू असे पक्षीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. हिरडा, जांभूळ, ऐन, अंजन, करवंद, तमालपत्र, शिकेकाई यांची दाट झाडी इथे आहे आणि त्याचबरोबर शेकडो रानफुले, नेची आणि अनेक आमरी यांचेही दर्शन सहज होते.

Tour to Amboli
Poli Ladu Recipe : शिळ्या पोळ्या उरल्या आहेत? मग बनवा खास गुळाचा लाडोबा

कसं जायचं?

तुम्हाला इथे जाण्यासाठी पुणे, मुंबई, बेळगाव, कोल्हापूर इथून एस टी बसेस उपलब्ध आहेत. तसेच रेल्वेने जायचं असेल तर कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड या स्टेशनावर उतराव लागतं. तिथून खाजगी गाडीने आंबोलीस जाता येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.