धबधब्यांचा आनंद घ्यायचा तर मध्य प्रदेशात नक्की जा !

हे धबधबे पाहण्यासाठी निर्सगप्रेमींची येथे जत्राच असते
dhundhar waterfalls
dhundhar waterfalls waterfalls
Updated on

जळगाव ः भारतातील (India) सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्य आहे. या राज्याला इतिहास (History) तसेच नैसर्गीक सौंदर्य (Natural beauty) भरपूर लाभलेला आहे. हे पाहण्यासाठी भारतातून नव्हे परदेशातून सुध्दा लाखो पर्यटक येतात. मध्य प्रदेशात मोठी वनसंपदा (Forest resources) लाभली असून तसेच येथील भौगोलीक रचनेनूसार नद्यांवरवील आश्चर्यकारक धबधबे (Waterfalls) सर्वांना मोहीत करतात. हे धबधबे पाहण्यासाठी निर्सगप्रेमींची येथे जत्राच असते तर चला जाणून घेवू या धबधब्यांबद्दल...

( india amazing waterfalls madhya pradesh information)

dhundhar waterfalls
International Museum Day 2021: भारतातील 'या' म्युझियम्समध्ये आहेत आश्चर्यचकित करणाऱ्या प्राचीन वस्तू

दूध धारा धबधबा

मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यात दूध धारा धबधबा आहे. या धबधब्याविषयी अशी मान्यता आहे की दुर्वासा ऋषींनी येथे तपश्चर्या केली होती, म्हणूनच या धबधब्याचे नाव दुर्वासा धबधबा असे होते. नंतरच्या काळात हे दुध प्रवाह म्हणून लोकप्रिय झाले. तसेच नर्मदा नदी एका राजकुमारावर प्रंसन्न झाली आणि त्यांना दुधाचा प्रवाह निघाला म्हणून त्याचे नाव दूध धारा असे ठेवले गेले. हा धबधबा सुमारे 15 मीटर उंचीवरून पाणी खाली पडतो.

धुंधर धबधबा..

मध्य प्रदेशात जबलपूर शहर असून या शहरापासून 21 किमी अंतरावर धुंधर धबधबा आहे. हा धबधबा पाहतांना मनुष्य निर्सगाचे सुंदर दुष्य बघत असतो. जेव्हा या धबधब्याचे पाणी सुमारे 18 मीटरपेक्षा जास्त उंचीवरून खाली येते तेव्हा पर्यटकांमध्ये एक वेगळाच सूर येतो. तुम्ही जबलपूरला भेट देत असाल तर नक्कीच इथे या. येथे जोडप्यांची चांगलीच रेलचेल असते. त्यामुळे या धबधब्याला रोमँटिक धबधबा देखील म्हणतात.

dhundhar waterfalls
राजस्थानचा इतिहास जाणायचायं..तर या संग्रहालयांना नक्की भेट द्या !

चाचि धबधबे

मध्य प्रदेशातील रीवापासून सुमारे 42 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरमौर जिल्ह्यात चाचि धबधबा आहे. हा धबधबा भारतातील 23 वा सर्वोच्च उंचीवर आहे. धबधबा सुमारे 115 मीटर खोल आणि सुमारे 175 मीटर रुंद आहे. हा धबधबा झारन बीहार नदीने तयार केला आहे. या धबधब्याच्या सभोवतालचा परिसर हिरवाई नेटलेला आहे. येथे मोठ्या संख्येने नागरीक पिकनिक साठी येत असतात.

waterfalls
waterfallswaterfalls

चांदी धबधबा

मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात निसर्गप्रेमीसाठी नंदनवन असलेला चांदी पडणे धबधबा प्रसिध्द आहे. हा धबधबा भारतातील 30 वा सर्वात सुंदर आणि आश्चर्यकारक धबधबा आहे. या धबधब्याची उंची सुमारे 350 फूट आहे. आपण सांगू की हा धबधबा चांदीची व राणीची सातपुरा म्हणूनही ओळखला जातो. उत्तम पिकनीक स्पाॅट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.