उष्णता जास्त नसेल, तर सप्टेंबर महिना प्रवासासाठी योग्य मानला जातो.
गणेशोत्सव झाला की तुलनेत पावसाचा जोर कमी येतो. या कालावधीत मान्सून जवळपास संपत आला असल्याची काही संकेत मिळत असतात. त्यामुळे या सप्टेंबर महिन्यात हवामानात अनेक बदल होत असतात. थंडगार, नयनरम्य आणि गारवा देणारे हे वातावरण अनेकांना जवळचे वाटते. या दरम्यान, जर उष्णता जास्त नसेल, तर हा महिना प्रवासासाठी योग्य मानला जातो. अनेक पर्यटक या महिन्यात फिरण्याचा आनंदही घेतात.
सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी सणांचे आयोजन केले जाते. त्यामुळे तुम्हीही देशभरात कुठे फिरण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला भारतातील काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटण्यासोबत तुम्ही इथल्या फेस्टिव्हलमध्येही सहभागी होऊ शकता. चला तर मग या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया..
केरळ :
सप्टेंबर महिन्यात तुम्ही केरळला फिरायला जाऊ शकता. केरळमधील अलाप्पुझा आणि अलेप्पी येथे दरवर्षी नेहरू ट्रॉफी बोट रेस फेस्टिव्हल याच महिन्यात आयोजित केला जातो. ही बोट शर्यत खूप प्रसिद्ध आहे. त्यात सहभागी होण्यासाठी हजारो लोक येतात. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. अशा स्थितीत यंदा त्याचे आयोजन होईल, अशी अपेक्षा आहे.
अरुणाचल प्रदेश :
सप्टेंबर महिन्यातील ट्रिपसाठी काही नियोजन करत असाल, तर अरुणाचल प्रदेशातील झिरो तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. येथील सुंदर पर्वत आणि हिरवळीची ठिकाणे तुमचे मन जिंकेतील. दरवर्षी 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत येथे एक महोत्सवही आयोजित केला जातो. झिरो फेस्टिव्हल ऑफ म्युझिक असे या महोत्सवाचे नाव आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागातून लोक या ठिकाणी भेट देण्यास येतात.
मुंबई :
सप्टेंबर महिन्यात तुम्ही सुट्टीसाठी मुंबईलाही जाऊ शकता. गणेश चतुर्थीचा सण सप्टेंबर महिन्यात येतो आणि गणेश चतुर्थीचा सण मुंबईत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी गणपतीचे मंडप उभारले जातात. तसेच आता तुम्ही विजयादशमीसाठीही मुंबईत भेट देऊ शकता.
लडाख :
मार्का व्हॅली ट्रेक हा लडाखमधील प्रसिद्ध ट्रेकपैकी एक आहे. या ट्रेक दरम्यान तुम्हाला खूप सुंदर नजारे, गावे, पर्वत, डोंगर पहायला मिळतील. मार्का व्हॅली ट्रेक हा लडाखमधला अतिशय अवघड ट्रेक मानला जातो. मात्र इथे गेल्यास तुम्हाला अनेक वेगळे अनुभव मिळू शकतील.
उत्तराखंड :
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे उत्तराखंडमधील चमोली येथे स्थित युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. 87 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेल्या या व्हॅलीमध्ये अनेक प्रकारची फुले आहेत. जर तुम्ही निसर्गप्रेमी आहात तर तुमच्यासाठी यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही. येथे असलेली रंगीबेरंगी फुले तुम्हाला भुरळ घालतील. त्यामुळे या ठिकाणी भेट देण्यासाठी सप्टेंबर महिना योग्य आहे. येथे तुम्हाला ब्रह्मकमळ फुललेली पाहायला मिळतील. व्हॅली ऑफ फ्लॉवर्सपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला ट्रेक करावे लागेल. पण या ठिकाणचे सौंदर्य पाहून परत येण्याची इच्छा होत नाही एवढं मात्र नक्की!
शिलाँग :
सप्टेंबर महिन्यात भेट देण्याचे हे एक बेस्ट ठिकाण आहे. या परिसरातील सुंदर पर्वत, प्रसन्न वातावरण आणि हिरवळ तुमच्या हृदयाला स्पर्श करते. शिलाँगमध्ये दरवर्षी शरद महोत्सवाचे आयोजन केले जाते. यादरम्यान, जत्रेचे आयोजन केले जाते आणि आजूबाजूच्या गावातील लोक अनेक प्रकारचे चेहरे विकण्यासाठी येतात. यासोबत येथे पतंग उडवण्याच्या स्पर्धचेही आयोजन केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.