नागपूर : पर्यटनाचे महत्त्व आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. आजच्या धकाधकीच्या जीवन शैलीत तर पर्यटन हा विषय प्रत्येकाचाच अगदी जिव्हाळ्याचा समजला जातो. मानसिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मेडिसिनचा दर्जाही पर्यटनाला दिला गेला आहे. पर्यटन क्षेत्रात रोजगाराचे उत्तम साधन म्हणून समाजाने पहावे यासाठी टुरिझम या संस्थेचे फार मोठे योगदान असल्याचे दिसून आले आहे.
भारतीय पर्यटनाचा इतिहास हा हजारो वर्ष जुना आहे. हजारो वर्षापासून भारतीय उपखंडात लोक तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत आले. भारतीय ग्रंथात सुद्धा याचे पुरावे भेटतात ज्यात, पंढरीची वारी, कुंभमेळा यांचे संदर्भ वाचण्यास मिळतात. तसेच इंग्रजांनी जेव्हा भारतावर राज्य केले तेव्हा त्यांचा दोन राजधानी असत, हिवाळी राजधानी आणि उन्हाळी राजधानी. इंग्रज उन्हाळ्यात महाबळेश्वरला, शिमला, कश्मीर, उटी, म्हैसूर अशा ठिकाणी राहणे पसंत करीत होते.
अतिप्राचीन काळापासून प्रवास ही मनुष्यप्राण्याची सहज प्रवृत्ती आहे. प्राचीन काळी प्रवासाचा उद्देश नवीन प्रदेशचा शोध घेणे, व्यापार करणे व धार्मिक स्थळांना भेट देणे हा होता. हे प्रवासी व व्यापारी विविध भूप्रदेश, देश व राज्यातून प्रवास करीत असत. त्यामुळे विविध राज्यांच्या राजधान्या, शहरे, बंदरे, बाजारपेठांची केंद्रे, व्यापारी मार्ग यांचा त्यांच्याशी संबंध येत असे. हा प्रवास व व्यापार यांतून विविध मानवी समूह, संस्कृती यांची परस्पर ओळख झाली.
आनंद मिळविण्यासाठी, मनोरंजनासाठी प्रवास ही संकल्पना प्रथम युरोपातील रोमन लोकांनी रुजवली. रोमन साम्राज्याच्या काळात तेथील लोक इजिप्तमधील पिरॅमिड्स, ग्रीसमधील अथेन्स व स्मार्टा या नगरांची भव्य नगररचना, तेथील देव देवतांची मंदिरे, मूर्ती, तेथील क्रीडांगणे पाहण्यासाठी जात. पुढे युरोपमधील पुनरूज्जीवनामुळे जगभरातील वसाहतींचा व साम्राज्याचा विस्तार, औद्योगिक क्रांती व यातून युरोपमध्ये सुरू झालेला संपत्तीचा ओघ यांमुळे तेथे पर्यटनही श्रीमंतांची मक्तेदारी न राहता मध्यम वर्गसुद्धा पर्यटनात सहभागी झाला. त्यात धर्मप्रसारक, विद्वान, लेखक, कवी व व्यापारी यांचा समावेश होता. युरोपियन पर्यटकांनी आधुनिक पर्यटनाचा पाया घातला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.