नागपूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) उत्तर भारत टूरिस्ट ट्रेन चालविण्यात येणार आहे. या ट्रेनमधून लाल किल्ला, ताजमहाल, वैष्णोदेवी, वाघा बॉर्डरसह उत्तर भारतातील पर्यटन व तीर्थ स्थळांना भेटी देता येणार आहे.
रेनीगुंटा येथून २७ ऑगस्टला ही ट्रेन रवाना होईल. त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता नागपूरला पोहोचेल. एकूण १० रात्री आणि ११ दिवसांच्या यात्रेत आग्रा येथील ताजमहाल, दिल्लीतील लाल किल्ला, कुतूब मिनार, अक्षरधाम मंदिर, इंडिया गेट, लोटस टेंपल, मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी, वैष्णोदेवी, अमृतसरचे स्वर्ण मंदिर, हरिद्वारच्या तीर्थ क्षेत्रांना भेटी देता येईल.
स्लिपर क्लाससाठी प्रतिव्यक्ती १० हजार ४०० रुपये तर एसी प्रवासासाठी १७ हजार ३३० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. टूर पॅकेजमध्येच रेल्वे स्थानकापासून पर्यटनस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी वापरली जाणारी वाहने, रात्रीचा मुक्काम, दिवसातून तीन वेळा जेवणाचा समावेश आहे. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. टुरिस्ट ट्रेनला ५ तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे आणि ५ स्लिपर कोच राहतील.
एकूण ६५६ प्रवाशांची व्यवस्था राहणार असून आत्तापर्यंत ३०० प्रवाशांचे बुकिंगही झाले आहे. यात्रेच्या योग्य संचलनासाठी टूर व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक डब्यात कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता प्रत्येक प्रवाशाला रोज मास्क व सॅनिटायजर उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती आयआरसीटीसीचे क्षेत्र व्यवस्थापक एस. जोराल्ड सोरेंग यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.