Nagpur Trip प्लान करताय, मग या ठिकाणांना नक्की भेट द्या

पर्यटनासाठी Tourism नागपूर हे एक सुंदर शहर आहे. नागपूरमध्ये तुम्ही विविध ठिकाणांना भेट देऊ शकता. ही ठिकाणं कोणती ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
भेट नागपूरला
भेट नागपूरलाEsakal
Updated on

महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नारपूर शहर ऑरेंज सिटी Orange City म्हणूनही ओळखलं जातं. नागपूर हे सांस्कृतीक, ऐतिहासिक वारसा Historical Heritage लाभलेलं आणि तितकच सुंदर अंसं निसर्गरम्य ठिकाण आहे. Tourism Tips in Marathi Know these places in Nagpur Must Visit

खास करून हिवाळ्यामध्ये Winter तुम्ही नागपूरला भेट देऊन तिथल्या ऐतिहासिक वास्तू, सुंदर जलाशय आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता. पर्यटनासाठी Tourism नागपूर हे एक सुंदर शहर आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमधून नागपूर शहर गाठण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.

ट्रेन, तसंच रस्तेवाहतूक म्हणेज बस किंवा स्वत:च्या गाडीने तुम्ही नागपूर गाठू शकता. तसचं मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर अशा विमानसेवा देखील उपलब्ध आहे. नागपूरमध्ये तुम्ही विविध ठिकाणांना भेट देऊ शकता. ही ठिकाणं कोणती ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे देखिल वाचा-

भेट नागपूरला
Monsoon Tourism : एकावर एक फ्री! या ठिकाणी देवादर्शनासह घेता येईल पावसाळ्याच्या सहलीचा आनंद

दीक्षाभूमी स्तूप- नागपूरमधील दीक्षाभूमी स्तूप हे बौद्ध धर्मियांचं एक पवित्र आणि लोकप्रिय असं स्मारक आहे. संगमरवर आणि ग्रेनाइटपासून तयार करण्यात आलेल्या या स्तूपाची उंची १२० फूट असून आशिया खंडातील हे सर्वाच मोठं स्तूप आहे. या स्तूपामध्ये एकावेळी ५ हजार लोक बसू शकतात.

हे स्तूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडर यांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्याच्या स्मरणार्थ बांधण्यात आलं आहे. वर्षभरात हजारो बौद्ध बांधव आणि पर्यटक या स्तूपाला भेट देतात.

रामटेक किल्ला – नागपूर शहरापासून जवळपास ५० किलोमीटर दूर एका डोंगरावर असलेल्या रामटेक किल्ल्यामध्ये श्रीरामांचं मंदिर आहे. पौराणिक कथांनुसार श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवण्यापूर्वी या मंदिरामध्ये विश्रांती घेतली होती. त्यामुळे इथं रामाची विशेष पूजा केली जाते.

कुटुंब किंवा मित्र मैत्रिणींसोबत भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. इथला सभोवतालचा परिसरदेखील अत्यंत सुंदर आहे. शहारापासून दूर असल्यामुळे इथे शांतता अनुभवायला मिळते.

अडासा गणपती मंदीर- नागपूरमधील एका छोट्याश्या गावामध्ये असलेलं अडासा गणपती मंदीरात अनेक गणेशभक्त भेट देत असतात. या गणपती मंदीरात श्रीगणेशाची १२ फूट उंच भव्य मूर्ती आहे. या मंदिरात तुम्ही बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी जाऊ शकता.

ड्रॅगन पॅलेस मंदिर- नागपूर मधील ड्रॅगल पॅलेस मंदिर हे लोटस टेंपल म्हणूनही ओळखल जातं. ही आकर्षक वास्तू नागपूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या कम्पी या ठिकाणी आहे. या मंदिरामध्ये गौतम बुद्धांची चंदनापासून तयार करण्यात एक भव्य आलेली मूर्ती आहे.

या मंदिराच्या सभोवताली सुंदर बगिचा तयार करण्यात आलाय. या मदिंरात आणि परिसरात तुम्हाला एक सकारात्मक उर्जेची अनुभुती येईल. अनेक बौद्ध धर्मिय इथं प्राथर्ना आणि ध्यान करण्यासाठी येत असतात.

हे देखिल वाचा-

भेट नागपूरला
Bhimashankar Tourism : भीमाशंकर! पर्यटनाचा एक स्वर्गानुभव

अक्षरधाम मंदिर- अक्षरधाम मंदिर म्हणजे नागपूरमधूल स्वामीनारायण मंदिर हे देखील नागपूर शहरातील एक आकर्षक असं मंदिर आहे. रिंग रोडवर असलेल्या स्वामीनारायण मंदिरामध्ये कॅफेटेरिया, लहान मुलांना खेळण्यासाठी मोठे बगिचे, पार्किंग अशा अनेक सुविधा आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन या मंदिरामध्ये नक्कीच भेट देऊ शकता.

अंबाझरी जलाशय- नागपूर शहरातील ११ तलावांपैकी एक म्हणजे अंबाझरी तलाव. अंबाझरी तलाव या नागपूर शहरातील सर्वात मोठा तलाव आहे. नागपूर शहरातील हे एक आकर्षणाचं ठिकाण आहे. या तलावाच्या ओव्हर फ्लो पॉइंटजवळ ५१ फूट उंच स्वामी विवेकानंद यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे.

स्मारकाच्या खालच्या भागात विवेकानंद यांच्या आयुष्यावर आधारित गॅलरी तयार करण्यात आली आहे. संध्याकाळच्या या परिसरामध्ये इथं खास रोषणाई केली जाते. त्यामुळे इथं सेल्फी पाइंट तयार झाला आहे.

रमन विज्ञान केंद्र- नागपूरमध्ये असलेलं रमन विज्ञान केंद्र हे मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राशी संलग्न आहे. लोकांमध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी तसंच विज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने हे विज्ञान केंद्र सुरु करण्यात आलं आहे.

१९९२ मध्ये या विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर १९९७ साली इथं तारांगण देखील सुरू करण्यात आलं.

फुटाला तलाव- नागपूरमधील लोकप्रिय तलावांपैकी एक म्हणजे फुटाला तलाव. हे तळं जवळपास ६० एकर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे. संध्याकाळच्या वेळी आकर्षक कारंजी आणि रोषणाईमुळे हे तळ अधिकच सुंदर दिसतं. इथं पर्यटकांसाठी अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट देखील आहेत. तसचं संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी इथं तुम्ही नक्की जाऊ शकता.

नागझिरा अभयारण्य- जर तुम्ही निसर्ग आणि प्राणी प्रेमी असाल तर तुम्ही नागझिरा अभयारण्याला नक्की भेट द्या. इथं अनेक प्राणी आणि वनस्पतींच्या विविध प्रजाती आढळतात. तसंच इथल्या गर्द झाडीत रात्र घालवण्यासाठी खास कुट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या ठिकाणांसोबतच तुम्ही नागपूरमधील खिंदली आणि शुक्रवार तलावालाही भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.