अजिंठा व्ह्यू पॉइंटवरील छत्रीची दुरवस्था, लेणी बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावसाळ्यात होणार गैरसोय; छत्रीचे पत्रे उडाले

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी विदेशातून पर्यटक येतात.लेण्या पाहून झाल्यानंतर काही पर्यटक व्ह्यू पॉइंटकडे जातात.
अजिंठा व्ह्यू पॉइंटवरील छत्रीची दुरवस्था, लेणी बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावसाळ्यात होणार गैरसोय; छत्रीचे पत्रे उडाले
Sakal
Updated on

अनिल रावळकर

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचा ज्या ठिकाणाहून शोध लागला, त्या व्ह्यू पॉइंटपर्यंत जाण्यासाठी वन विभागाने पायऱ्या बनविल्या आहेत. रस्‍त्यात पर्यटकांना विसावा घेण्यासाठी लोखंडी छत्री बांधण्यात आलेली असून, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे तिची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होणार आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी विदेशातून पर्यटक येतात.लेण्या पाहून झाल्यानंतर काही पर्यटक व्ह्यू पॉइंटकडे जातात. दरम्यान, पायी प्रवास करताना रस्त्यामध्ये झाडे, कुंड, टेकड्या, नद्या बघण्यासारख्या आहेत. हे दृश्य बघताना पर्यटकांना विसावा घेण्यासाठी आणि ऊन-पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध लोखंडी छत्री बांधण्यात आली आहे.

आजघडीला छत्रीची दुरवस्था झाली आहे. ऊन-पावसात आधार देणाऱ्या छत्रीची वादळी, वाऱ्याने पत्रे उडून गेल्याने पावसाळ्यात पर्यटकांना भिजतच जावे लागणार आहे. तर काही पत्रे जीर्ण झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने लेणी, धबधबा व निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.

अजिंठा व्ह्यू पॉइंटवरील छत्रीची दुरवस्था, लेणी बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावसाळ्यात होणार गैरसोय; छत्रीचे पत्रे उडाले
श्रीक्षेत्र राजूरला पर्यटनस्थळाचा ‘अ’ दर्जा, संस्थानकडून २० एकरांत विकसित होणार कृषी पर्यटन केंद्र

मात्र, छत्रीमुळे पर्यटकांची गैरसोय होणार आहे. याकडे अजिंठा वन विभागाने लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी पर्यटकांच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान, लेनापूर, सावरखेडा ग्रामस्थांना बाहेरगावी जाताना अजिंठा लेणीतून जावे लागते. त्यांनाही पायी जाताना थकवा घालविण्यासाठी छत्रीचा उपयोग होतो.

रस्ता बंद, पर्यटकांमध्ये नाराजी

पर्यटकांसाठी अजिंठा लोणीतील मुख्य आकर्षण असलेल्या सप्तकुंड धबधब्याकडे जाण्यासाठी वन उद्यानातून रस्ता होता. मात्र, तो बंद असल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. येथून धबधब्याचे सौंदर्य न्याहाळता येत होते. आता पर्यटक व्ह्यू पॉइंटवरकडे जाणाऱ्या रस्त्याने चढून धबधब्याकडे जातात. वरच्या बाजूला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना नसल्याने हा परिसर धोकादायकच मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.