Travel and Earn : जग फिरायच आहे पण पैसे नाहीयेत? मग एकदा वाचाच... पैसे कमवण्याचा एक अनोखा चान्स

तुम्ही फिरु शकतात आणि त्या बदल्यात लोकं तुम्हाला पैसे देतील...
Travel and Earn
Travel and Earn
Updated on

Earn with Travel : फिरायला कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला फिरण्याची आवड असते. समुद्रकिनाऱ्यावरील सुट्टीपासून ते काही अॅडवेंचर ट्रेकपर्यंत, लहान मुलांपासून तर अगदी म्हाताऱ्यांपर्यंत फिरणं सगळ्यांनाच आवडतं. पण ज्यांना सर्वात जास्त फिरणं आवडतं असे लोकं म्हणजे तरुण पिढी.

नवीन नवीन जग एक्सप्लोर झालेलं असतं आणि अशा वेळेस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्याची इच्छा असते, त्यांच्यासाठी ते एक थ्रिल असते. पण तरुण पिढी ही एकमेव अशी पिढी आहे ज्यांना पैसे कामवायची इच्छा तर खूप असते, पण जमत नाही, आणि त्याचवेळी आपल्यातल्या काही बदलांमुळे घरच्यांकडून पैसे घेण्याची इच्छा सुद्धा होत नाही.

तुमच्या सोबतही असंच होतं आहे का? फिरायला खूप आवडतंय पण फिरला येत नाही, कारण त्या ठिकाणी जाणं परवडणार नाही, मग अशा वेळेस काय करायचं? यासाठी ह लेख शेवटपर्यंत वाचा..

तर तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्ही फिरु शकतात आणि त्या बदल्यात लोकं तुम्हाला पैसे देतील, एकमिनिट, बरोबर वाचलत... आपल्या आवडत्या ठिकाणी बिनधास्त फिरायला जा, अन् तिथे गेलात की या टिप्स फॉलो करा, आणि पैसे कमवा. आता तुम्हाला कोणी हे नाही म्हणणार काय नुसतं उंडारत बसतात सगळीकडे... कारण तुम्ही आपली जबाबदारी स्वतः घेणार असाल.

Travel and Earn
Kamshet Trip : आपल्या पार्टनर सोबत पॅराग्लायडिंगची मजा घ्या तीही पुण्यापासून अगदीच जवळ

फ्रीलान्सिंग

फ्रीलान्सिंग, खूप सोपा पर्याय पैसे कमवण्याचा. तुम्ही जग एक्सप्लोर करत असतांना फ्रीलान्सिंग करुन पैसे कामवू शकतात. सध्या अशा अनेक जॉब ऑपर्चुनिटी उपलब्ध आहेत जिथे तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून कुठेही आणि कोणासाठीही काम करु शकतात.

अगदी मोठ्या मोठ्या कॉर्पोरेटमधले लोकंसुद्धा आपलं ऑफिसच काम झालं की फ्रीलान्सिंग करत असतात. अर्थात हे आपल्या स्किल्सवर अवलंबून आहे की आपल्याला काय येत? ग्राफिक डिझाईन, रायटींग, कोडींग, सोशल मीडिया मॅनेजमेंट यासह इतर काही स्किल्सद्वारे तुम्ही फ्रीलान्सिंग मिळवू शकतात.

इंटेरनेटवर अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत जिथे फ्रीलान्सिंग कामाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात, अशात अशा वेबसाइट शोधून त्या फर्ममध्ये बोलून तुम्ही आपलं फ्रीलान्सिंग काम सुरु करु शकतात. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून फ्रीलान्सिंग करता येते. अशा कामासाठी फक्त एक टार्गेट असतं, बाकी काही नाही.

म्हणजे तुम्हाला फक्त एखादं काम दिलं जात आणि ते तेवढ्या वेळेत किंवा कधी कधी तशा पद्धतीने पूर्ण होणं अपेक्षित असतं. त्या एखाद्या कामासाठी तुम्हाला पैसे आकारले जातात. म्हणजे आता तुम्ही आपला लॅपटॉप उचलून जग फिरायला मोकळे.

Travel and Earn
विमान प्रवासात मोबाइल फ्लाईट मोडवर का ठेवतात? : Airplane Travel

हाऊस सिटिंग

फ्रीलान्सिंग शिवाय दुसरा खूप चर्चित आणि सोपा पर्याय म्हणजे हाऊस सिटिंग. हाऊस सिटिंग हा प्रवास करताना पैसे कमवण्याचा एक खूप उत्तम मार्ग आहे. पण म्हणजे नक्की काय करायचं? घर सांभाळायच.

असे अनेक लोकं असतात जे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात, आणि सगळीकडे राहणं त्यांना शक्य नसतं, तुम्ही त्यांच्या घरी राहून पैसे कमावू शकतात. त्यांच्यावतीने त्यांचं घर सांभाळा आणि त्याबदल्यात पैसे कमवा.

तुम्हाला अशा लोकांना शोधून, त्यांच्याशी बोलावं लागेल, अजून एक टिप देयची तर अशा हाऊस सिटिंगच्या संधी तुम्ही जिथे जय प्रदेशात फिरायला जाणार असाल तिथेही शोधू शकतात म्हणजे तुमची राहण्याची सोय सुद्धा होते आणि तुम्हाला पैसे पण मिळतात. यासाठी इंटरनेटवर अशा घरमालकांची माहिती मिळू शकते.

Travel and Earn
Travel with Partner : जोडीदारासोबत फिरण्यासाठी ही रोमॅण्टिक ठिकाणे आहेत उत्तम

टुर गाईडर

जर तुम्हाला जिथे फिरायला जाताय त्या ठिकाणाबद्दल माहिती असेल तर बेस्ट आहे. तुम्ही तिथे टुर गाईडर म्हणून काम करत गायडिंग करत पैसे कमावू शकतात. टेंशन घेऊ नका, तुम्ही एखाद्या ठिकाणी वारंवार भेट दिली असेल आणि प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींपर्यंत त्याची माहिती असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही लोकांचा टूर गाइड बनू शकतात.

यासाठी तिथल्या ट्रॅव्हल एजंसीमध्ये तुम्ही अप्लाय करु शकतात. तिकडे अप्लाय करुन तुम्ही टुर गाईडर म्हणून काम करु शकतात आणि सोबत त्या जागेच्या आजूबाजूच्या जागा देखील एक्सप्लोर करु शकतात.

Travel and Earn
Travel News : सगळीकडे फिरून झालं आता कुटुंबसह ही ट्रीप एन्जॉय करा, वाचा खर्च अन् ठिकाण

सेलिंग क्राफ्ट

जर तुम्हाला कोणतीही हस्तकला बनवता येत असेल तर ते प्रवास करतांना तुम्ही अशा वस्तू बनवून विकू शकतात. पेंटिंग्ज, शोभेच्या वस्तू, मण्यांच्या दागिन्यांसह अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही विकल्या जाऊ शकतात.

किंवा तुम्ही त्याचे तिथे छोटेसे स्टॉल सुद्धा लावू शकतात. सध्या तसेही फार एक्स्पो भारत असतात अशात ही खूप उत्तम संधी असेल.

Travel and Earn
April Travel : एप्रिलच्या उन्हात मनाला थंडावा देतील ही सहलीची ठिकाणे

फोटोग्राफी

फोटोग्राफी ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला जमत नाही, जर तुम्हाला वाटत की तुमच्यात ते स्किल्स आहेत तर डन आहे. तुम्ही आपले फोटो काढून ते ट्रॅवल एजंसीला पाठवू शकतात. किंवा सोशल मीडियासाठी म्हणून काम करुन सुद्धा तुम्ही हे फोटो पाठवून पैसे कमवू शकतात, किंवा एखादा ट्रॅवल शो असेल तर त्यासाठीही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.