Winter Tourism : डिसेंबरमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? मग, 'या' बजेटफ्रेंडली ठिकाणांचा करा विचार

डिसेंबर महिन्यात तुम्ही भारतातील काही खास ठिकाणांना आवर्जून भेट देऊ शकता
Winter Tourism
Winter Tourismesakal
Updated on

Winter Tourism : डिसेंबरमध्ये नाताळचा सण असतो आणि याच महिन्याच्या शेवटी आपण नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करतो. त्यामुळे, या महिन्यामध्ये फिरायला जाणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी असते.

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लोक खास सुट्ट्यांचा प्लॅन करतात आणि कुठेतरी फिरायला जातात. जर तुम्ही देखील डिसेंबर महिन्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

डिसेंबर महिन्यात तुम्ही भारतातील काही खास ठिकाणांना आवर्जून भेट देऊ शकता आणि तुमची सुट्टी छान घालवू शकता. कोणती आहेत ती ठिकाणे जी फिरण्यासाठी बेस्ट आहेत? चला तर मग जाणून घेऊयात त्या ठिकाणांबद्दल.

Winter Tourism
Raigad Fort Tourism : धुक्याची पसरली झालर, किल्‍ले रायगडावर पर्यटकांचा बहर; सुट्यांमुळे ओघ वाढला

कसोल

हिमाचल प्रदेशातील फिरण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे कसोल होयं. हिवाळ्यात कसोलला फिरायला जाणे हा बेस्ट ऑप्शन आहे. हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

कसोलमधील नयनरम्य नजारे, पहाडी प्रदेश हे सर्व पाहण्यासारखे आहे. शिवाय, येथील अनेक टुरिस्ट स्पॉट्स फेमस आहेत. दिल्ली ते कसोलचे अंतर हे अंदाजे ४८२ किमी आहे. बजेटफ्रेंडली म्हणून तुम्ही कसोलचा विचार नक्कीच करू शकता.

शिमला

शिमला हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे, हे तर सर्वांनाच माहित आहे. मात्र, हिवाळ्यात आणि खास करून डिसेंबर महिन्यात शिमल्याचे सौंदर्य पहाण्यासारखे असते.

हिमाचल प्रदेशातील सुप्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून शिमला प्रसिद्ध आहे. डिसेंबर महिन्यात येथे खास बर्फवृष्टी होते. या बर्फाच्छादित हिल स्टेशनवर येऊन तुम्ही हिरवाईमध्ये आणि बर्फामध्ये निवांत वेळ घालवू शकता.

डलहौसी

हिमाचल प्रदेशातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून डलहौसी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असलेले हे एक शहर आहे. देवदारच्या वृक्षांनी बहरलेले आणि सजलेले हे शहर आहे.

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही डलहौसीला नक्कीच भेट देऊ शकता.

Winter Tourism
Tourism News: थेट नववर्षापर्यंत पर्यटनाचा धमाका! केदारनाथ, बद्रिनाथ, अयोध्येसाठी बुकिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.