Travel Diaries : निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या..! काय झाडी..काय डोंगार, पाहायला इथं जावच लागतंय

Travel Diaries : येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील पक्षांचा प्रचार थंडावला असून अनेक नेते निवांत वेळ घालवताना दिसत आहेत.
Travel Diaries
Travel Diariesesakal
Updated on

Travel Diaries : सध्या देशातील अनेक भागांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. नुकत्याच ६ टप्प्यांसाठी निवडणुका पार पडल्या असून सातव्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान होणार आहे. येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील पक्षांचा प्रचार थंडावला असून अनेक नेते निवांत वेळ घालवताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी कन्याकुमारीला रवाना झाले. नुकतेच मोदींचे विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान सुरू झाले आहे. उद्या मोदी त्यांचे मौनव्रत आणि ध्यान पूर्ण करून दिल्लीला रवाना होणार आहेत. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदें निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी पोहचले आहेत. तिथे निवांत वेळ घालवतानाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.  

देशातील प्रचार थंडावल्यामुळे अनेक नेते निवांत वेळ घालवताना दिसत आहेत. आज आम्ही खास देशातील प्रसिद्ध अशा निवांत ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी राजकीय नेते रिलॅक्स होण्यासाठी जाऊ शकतात आणि निवांत वेळ घालवू शकतात. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

Travel Diaries
Healthy Snacks During Travelling : उन्हाळ्यात प्रवास करताना ‘हे’ हेल्दी खाद्यपदार्थ ठेवा सोबत, अनेक समस्यांची होईल सुट्टी

कोकण किनारपट्टी

कोकणातील समुद्रकिनारे हा पृथ्वीवरील जणू स्वर्गच आहे. मुंबईपासून गोव्यापर्यंत दक्षिणेकडे जाणारा हा सुंदर समुद्रकिनारा सौंदर्याची अप्रतिम खाणच आहे. कोकण किनारपट्टीवर विविध प्रकारचे समुद्रकिनारे आणि काही जलदुर्ग आहेत.

kokan
kokanesakal

या सुंदर बीचवर तुम्हाला निवांत वेळ घालवता येईल. समुद्रकिनाऱ्यांवर स्थित असणाऱे किंवा आसपास असणाऱ्या जलदुर्गांना ही भेट देता येईल. काही ठिकाणी तुम्हाला वॉटरस्पोर्टसचा ही आनंद घेता येईल.

पॅंगाँग तलाव

लडाख राज्यामध्ये स्थित असलेला हा पॅंगॉंग तलाव पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. निसर्गाचा अप्रतिम नजारा तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. कित्येक चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी झाले आहे. या तलावाची आकर्षक गोष्ट म्हणजे या तलावातील पाण्याचा रंग बदलत राहतो. दिवसा या पाण्याचा रंग निळा दिसत असला तरी रात्रीपर्यंत हा रंग निळा, आकाशी, पांढरा किंवा फिकट हिरवा दिसतो.

pangong Lake
pangong Lakeesakal

या ठिकाणी नितळ शांतता तुम्हाला अनुभवता येईल आणि निवांत वेळ घालवता येईल. हा सुंदर तलाव बर्फाच्छादित दऱ्यांमध्ये आहे.  

अल्मोडा

उत्तराखंडमध्ये स्थित असलेले हा जिल्हा पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. उत्तराखंड राज्यातील या सुप्रसिद्ध हिलस्टेशनवर तुम्ही निवांत वेळ घालवण्यासाठी जाऊ शकता.

Almoda
Almodaesakal

फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. हे ठिकाण पर्वतरांगांमध्ये स्थित असून, निसर्ग, नद्या, आणि सुंदर धबधब्यांनी वेढले आहे. यामुळे, तुम्हाला उकाड्यापासून आराम मिळेल. अल्मोडा जवळील इतर प्रेक्षणीय स्थळांना ही तुम्ही भेट देऊ शकता.

कूर्ग

कर्नाटक राज्यात स्थित असलेले हे ठिकाण उन्हाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. कर्नाटकातील हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या कुर्गमध्ये हिरवीगार झाडे, पर्वतरांगा, धबधबे यांचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. कूर्गमध्ये तुम्ही कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.

Travel Diaries
Travel Diaries : उन्हाळ्यात फिरण्यासाठी ऋषिकेशजवळची 'ही' ऑफबीट ठिकाणे आहेत बेस्ट, बजेटमध्ये ट्रीप करा प्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.