Travel In January : जानेवारीत ट्रीपचे नियोजन करताय ? ही पर्यटन स्थळे उत्तम पर्याय ठरू शकतात

जानेवारी हा इतर महिन्यांपेक्षा अनेक प्रकारे वेगळा असतो
Travel In January
Travel In January esakal
Updated on

Travel In January : जानेवारी हा इतर महिन्यांपेक्षा अनेक प्रकारे वेगळा असतो, कारण त्यात वर्षाची सुरुवात होते आणि हिवाळा चालू राहतो. तुम्ही जानेवारीमध्ये प्रवास करण्याचा विचार करत आहात, तर तुम्ही भारतातील या ठिकाणांना भेट द्यावी. जर तुम्हाला जानेवारीमध्ये प्रवास करायचा असेल, तर तुम्ही हिल स्टेशनला जाणे टाळा कारण या काळात बर्फवृष्टीमुळे धोका वाढतो. तसे, जर तुम्ही जानेवारीमध्ये सहलीची योजना आखत असाल, तर तुम्ही भारतातील ही पर्यटन स्थळे नक्की पाहावीत.

Travel In January
Food Recipe : फक्त गुजरात्यांची मोनोपॉली नाही तर घरच्या घरी बनवा खमंग चटपटीत ढोकळा

वाराणसी : हिंदू धर्माचं सर्वोच्च तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीमध्ये, आपण देशाची संस्कृती आणि वारसा जवळून जाणून घेऊ शकता. अध्यात्मिक दृष्टिकोनातून याला भेट देणे शुभ मानले जाते. तसे पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परदेशी प्रवासी येतात. इथल्या चहा आणि कचोरीसारख्या देशी पदार्थांची चव जानेवारीत हिवाळ्यात सहलीला अधिक अविस्मरणीय बनवू शकते.

Travel In January
Farali Misal Recipe: शुक्रवार उपवासानिमित्त बनवा खास फराळी मिसळ

जयपूर : जयपूर हे राजस्थान मधील एक असं शहर आहे जे की ऐतिहासिक वारशांनी वेढलेले आहे आणि येथे भारतीय संस्कृतीची उत्कृष्ट झलक पहायला मिळते. राजस्थान हा एक उष्ण प्रदेश आहे आणि जानेवारीत येथे भेट देणे योग्य आहे. येथे अनेक ऐतिहासिक किल्ले असून येथील देशी खाद्यपदार्थांची बाब वेगळी आहे.

Travel In January
Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

कच्छचे रण : गुजरातमध्ये अनेक प्रमुख पर्यटन स्थळे आहेत, परंतु येथे असलेले कच्छचे रण हे सर्वात आवडते ठिकाण मानले जाते. हिवाळ्यात तिथलं सौंदर्य प्रवाशांना इतकं वेड लावतं की इथून जावंसं वाटत नाही.

Travel In January
Share Market Holiday 2023 : नवीन वर्षात शेअर बाजाराला असतील 'एवढ्या' सुट्ट्या; पहा यादी

नाशिक महाराष्ट्र : महाराष्ट्रातील नाशिकमध्ये अनेक धबधबे आहेत, ज्यांना तुम्ही भेट द्यायलाच हवी. इथली वाईन खूप प्रसिद्ध आहे आणि ती भारताची वाईन कॅपिटल म्हणूनही ओळखली जाते. जानेवारीत इथे जरूर भेट द्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.