Travel News : हम्पीच्या विठ्ठल मंदिरातील स्तंभांमधून येतो गूढ आवाज

भारतात आजही न उलगडलेली रहस्य, घटना ऐकायला मिळतील
Travel News
Travel Newsesakal
Updated on

Travel News : भारतात आजही न उलगडलेली रहस्य, घटना ऐकायला मिळतील. ही रहस्ये अशी आहेत की विज्ञानाकडेही त्याचं उत्तर नाहीये. कर्नाटकातील हम्पीमध्येही तुम्हाला अशीच काही न सुटलेली कोडी पाहायला मिळतील. येथील विठ्ठल मंदिर भव्य कलेचा नमुना सादर आहे.

Travel News
Investment Tips : FD करताना या ट्रिक वापरा आणि फायदाच फायदा मिळवा!

हंपीला भेट देण्यासाठी दूरदूरच्या भागातून लोक येतात. पण जेव्हा ते इथल्या खांबांना स्पर्श करतात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. वास्तविक, ते संगीत स्तंभ म्हणून ओळखले जातात. हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. स्तंभांमधून संगीत कसे निघते हे एक रहस्य आहे.

Travel News
Titanic : टायटॅनिकच्या बेपत्ता प्रवाशांचे काय झालं? 111 वर्षांनंतर समोर आलं रहस्य

दिसायला सुंदर

हंपीच्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून, लोकप्रिय विठ्ठल मंदिराची भव्यता पाहण्यासारखी आहे. मंदिराच्या आत गेल्यावर तुम्हाला मंदिराच सौंदर्य बघून वेड लागेल.

स्तंभांमधून निघणारे संगीत

मंदिरात 56 संगीत स्तंभ आहेत, जे सारेगामा स्तंभ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. या स्तंभांमधून संगीताचा नाद तयार होतो. या खांबांना स्पर्श केल्यावर त्या खांबांमधून निघणारे संगीत स्पष्टपणे ऐकू येते. हे खांब छताला आधार देतात. मंदिराचे मुख्य खांब वाद्याच्या आकारात शैलीबद्ध आहेत. तसेच मुख्य स्तंभ सात लहान खांबांनी वेढलेला असून या खांबांवरून येणारा स्वरांचा आवाज वेगळा आहे. चंदनाचा फ्टका या स्तंभावर मारला की इथून तुम्हाला संगीत ऐकू येईल.

Travel News
Travel Story : देशात राहून मिळवा परदेशासारख्या दृश्यांचा आनंद

15 व्या शतकात बांधलेले मंदिर

विठ्ठल मंदिर 15 व्या शतकात बांधले गेले. भगवान विठ्ठलाला समर्पित हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या देवराया द्वितीयने बांधले होते. त्यामुळेच या मंदिराला विजय विठ्ठल मंदिर असेही म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.