Travel sickness : मोशन सिकनेसच्या त्रासामुळे प्रवास नकोसा वाटतोय? करा या टीप्स फॉलो

प्रवासादरम्‍यान ब-याच जणांना मोशन सिकनेसचा सामना करावा लागतो
Travel sickness :  मोशन सिकनेसच्या त्रासामुळे प्रवास नकोसा वाटतोय? करा या टीप्स फॉलो
Updated on

काही लोक असे हौशी प्रवासी असतात, की सतत फिरतीवर असतात‌. त्यांना प्रवासाचा कंटाळा येत नाही. पण काही लोक असे असतात ज्यांना प्रवास करायला अतिशय आवडतो. पण प्रवासात मळमळणं, उलट्या होणे असा त्रास होतो. त्यामुळे त्यांची प्रवास करायची इच्छा मरुनच जाते. या स्थितीला मोशन सिकनेस असे म्हणतात.

Travel sickness :  मोशन सिकनेसच्या त्रासामुळे प्रवास नकोसा वाटतोय? करा या टीप्स फॉलो
Travel: महाभारताच्या काळाची ओळख करून देणारे माणा गाव!

प्रवासादरम्‍यान ब-याच जणांना मोशन सिकनेसचा सामना करावा लागतो. मोशन सिकनेस हा कोणताही आजार नाही. तर ती एक मानसिक स्थिती आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या सहप्रवाशाला प्रवासादरम्‍यान मळमळणे, उलट्या होणे. काही विशिष्ठ लोकांनाच हा त्रास होतो याची कारणेही वेगळी आहेत. नॉर्मल लोक ट्रीपला बाहेर पडतात आणि रस्त्यात दिसतील ते पदार्थ खातात. एक झालं की एक पदार्थ पोटात जातात. त्यामुळे त्याचाही आपल्याला त्रास होतो.

Travel sickness :  मोशन सिकनेसच्या त्रासामुळे प्रवास नकोसा वाटतोय? करा या टीप्स फॉलो
Diwali Travel : ऐकावं ते नवलंच! दिवाळीत 'या' ठिकाणी साजरा होतो 'भूतांचा उत्सव'; पहा कुठे पहायला मिळेल भूत?

मोशन सिकनेस म्हणजे काय

प्रवास करताना होणारा त्रास म्हणजे मोशन सिकनेस होय. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, तसेच ज्यांना रोज औषधे सुरू आहेत अशा लोकांना हा त्रास होतो. प्रवासात, घाट लागणे, खड्डांचा रस्ता लागणे यामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते. त्यामुळे मोशन सिकनेस होते.

Travel sickness :  मोशन सिकनेसच्या त्रासामुळे प्रवास नकोसा वाटतोय? करा या टीप्स फॉलो
Travel : प्रवासाला जाताना या गोष्टी सोबत ठेवाच; प्रवास होईल सुखाचा

प्रवासात शरीराची जास्त हालचाल होते. त्यामुळे कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल दिले जातात. ज्‍यामुळे शरीरातील सिस्‍टीमचा गोंधळ उडतो. यामुळे चक्‍कर, मळमळ होण्याचा त्रास होतो. हा काही आजार नाही त्यामुळे त्याला गांभिर्याने घेण्याची काही गरज नाही. काही घरगुती उपाय केल्‍यानेही हा त्राम कमी होऊ शकतो. पाहुयात काही टीप्स ज्या प्रवासात मोशन सिकनेस होण्यापासून तूम्हाला मदत करतील.

Travel sickness :  मोशन सिकनेसच्या त्रासामुळे प्रवास नकोसा वाटतोय? करा या टीप्स फॉलो
Travel : फक्त पाच अमावस्येला या मंदिरात गेल्याने तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतात

ऍक्युप्रेशर करेल मदत

ऍक्युप्रेशरमध्ये अंगठा आणि बोटांच्या सहाय्याने शरीरावरच्या काही बागावर दबाव टाकला जातो. यामुळे शरीरातील काही नसा ऍक्टिव्ह होतात. जेव्हा कधी प्रवासात तूम्हाला अस्वस्थ वाटू लागेल, मळमळायला लागेल तेव्हा हाताच्या तळव्यावर दाब देऊन 30 मिनीटे ऍक्युप्रेशर करा. याने आराम मिळेल.

Travel sickness :  मोशन सिकनेसच्या त्रासामुळे प्रवास नकोसा वाटतोय? करा या टीप्स फॉलो
Travel : स्ट्रेस पळवण्यासाठी भारतातले हे धबधबे एक उत्तम ट्रीप प्लॅन असू शकतात

आवडता परफ्युम ठेवा सोबत

तुमचा आवडता परफ्युम प्रवासात सोबत ठेवणे ही एक चांगली कल्पना आहे. परफ्युम तूमच्या मनाला फ्रेश करण्याचेही काम करतात. तूम्हाला मळमळ, चक्कर येतेय असे वाटायला लागल्यावर परफ्युमचा वापर करा. त्यामुळे तूम्हाला फ्रेश वाटेल. आणि होणाऱ्या त्रासापासून तूमचे लक्ष विचलीत होईल. परफ्युमसोबतच पेपरमिंट, लॅव्हेंडर, वेलची, एखादे फूलाचा सुगंधही घेतल्यानेही तूम्हाला आराम मिळू शकेल.

Travel sickness :  मोशन सिकनेसच्या त्रासामुळे प्रवास नकोसा वाटतोय? करा या टीप्स फॉलो
Travelling : फिरायला जा आणि निरोगी राहा

ज्युस घ्या

प्रवासात फ्रेश वाटावे म्हणून आपण कॉफी चहा जास्त प्रमाणात घेतले जातात. त्यामुळे प्रवासात मळमळीचा त्रास होतो. पोट बिघडण्याचा त्रासही होतो. त्यामुळे प्रवासाचा कंटाळा घालवण्यासाठी कॉफी ऐवजी फळांचे ताजे ज्युस घ्यावे. प्रवास सुरू झाल्यावर सतत उलट्या होत असतील तर पाणी आणि ज्युस घ्यावे.

Travel sickness :  मोशन सिकनेसच्या त्रासामुळे प्रवास नकोसा वाटतोय? करा या टीप्स फॉलो
Travel Blog: बॅग भरो,निकल पडो; भारतापासून 4 तासाच्या अंतरावर असलेल्या देशात जायलाच पाहिजे!

विमान प्रवासात योग्य सीट निवडा

जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल. तूम्हाला त्याचा त्रास होत असेल तर पटकन फ्रेश होण्यासाठी जाता येईल अशा ठिकाणी बसावे. तसेच, विमान उड्डान करताना आणि लॅन्ड होताना अधिक त्रास होतो. यापासून बचाव करण्यासाठी विमानाच्या मध्याभागी बसावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.