Traval Tips : आजच्या घडीला तंत्रज्ञान खूप वेगानं प्रगती करत आहे. नवनवीन उपकरणं बाजारात येत आहेत. या उपकरणांपैकी एक म्हणजे सीसीटीव्ही बल्ब . होय, आता असा बल्ब आला आहे, ज्यामध्ये कॅमेरा बसवला आहे. हा बल्ब व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो.
सुरक्षिततेसाठी वापरण्यासोबतच त्याचा चुकीच्या मार्गानेही वापर होऊ शकतो. हे लक्षात घेऊन, आज आम्ही तुम्हाला हॉटेलच्या खोलीत सीसीटीव्ही बल्ब लावला आहे की नाही हे कसे शोधता येईल ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
हॉटेलच्या खोलीतील बल्बकडे दुर्लक्ष करू नका
जेव्हा आपण हॉटेलच्या खोलीत जातो तेव्हा सर्वप्रथम आपण बल्ब चालू करतो. जेव्हाही तुम्ही खोलीत जाल तेव्हा सर्वप्रथम बल्ब काळजीपूर्वक पहा . बल्ब नीट पाहिल्यास तो सामान्य बल्ब आहे की नाही हे सहज कळू शकते. कारण सीसीटीव्हीचा मोठा भाग सामान्य बल्बपेक्षा खूप वेगळा असतो.
सीसीटीव्हीच्या बल्बमधून निघणारा प्रकाश अंधारातही चमकतो. त्यामुळे बल्ब बंद केल्यानंतर तो पहा. त्या बल्बमधला दिवा चमकताना दिसला तर लगेच हे जाणून जा की तो सीसीटीव्ही बल्ब आहे
थर्ड पार्टी अॅपची मदत घ्या
प्ले स्टोअरवर अनेक अॅप उपलब्ध आहेत जे छुपे कॅमेरे शोधण्यात मदत करतात. तुम्ही प्ले स्टोअरवरून कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल फोनमध्ये काही परवानग्या घ्याव्या लागतील, पण थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करताना ते व्हेरिफाय केलेले आहेत का हे लक्षात ठेवा.
आपण कॉल करूनही शोधू शकतो
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून रेडिओ फ्रिक्वेन्सी उत्सर्जित होते. अशा परिस्थितीत, फोन बल्बजवळ घेऊन कॉल लावा आणि कॉल दरम्यान शिट्टीचा आवाज येतो कि नाही हे लक्षपुर्वक पाहा .असा आवाज आल्यास हे समजून जा कि तिथे सीसीटीव्ही बल्ब लावण्यात आला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.