Travel Tips तुम्हालाही कार प्रवासात मळमळत किंवा उलटी येते? मग करा हे उपाय...

मोशन सिकनेसमध्ये Motion Sickness सुरुवातीला अस्वस्थ वाटणं, मळमळणं हा त्रास जाणवू लागतो त्यानंतर उलटी होण्याची शक्यता असते. मात्र जर तुम्ही प्रवासाला Travel निघत असताना काही उपाय केल्यास मोशन सिकनेसचा त्रास कमी होवू शकतो
मोशन सिकनेस टाळण्यासाठी
मोशन सिकनेस टाळण्यासाठीEsakal
Updated on

कारचा प्रवास Travel सुखकर असला तरी अनेकांना कारमध्ये काही ठराविक मिनिटांच्यावर किंवा जास्त वेळ प्रवास केल्यास मळमळ किंवा उलटीचा त्रास होतो. यालाच मोशन सिकनेस असं म्हणतात. Travel Tips in Marathi how to avoid motion sickness

ही समस्या लहानांपासून मोठ्यांना कुणालाही होवू शकते. मोशन सिकनेसची वेगवेगळी लक्षणं असू शकतात. मोशन सिकनेसमध्ये मळमळ आणि उलटीसोबतच चक्कर येणं, डोकेदुखी Headache तसंच अस्वस्थ वाटणं अशी काही लक्षणंही दिसून येतात.

मोशन सिकनेसमध्ये Motion Sickness सुरुवातीला अस्वस्थ वाटणं, मळमळणं हा त्रास जाणवू लागतो त्यानंतर उलटी होण्याची शक्यता असते. मात्र जर तुम्ही प्रवासाला Travel निघत असताना काही उपाय केल्यास मोशन सिकनेसचा त्रास कमी होवू शकतो.

हलका आहार घ्या

कार प्रवासाला निघण्यापूर्वी मसालेदार किंवा तळलेल्या पदार्थांचं सेवन करू नका. तसंच जास्त न खाता हलका आहार घ्या. जास्त खाल्ल्याने प्रवासामध्ये मळमळण्याची शक्यता जास्त असते. तसंच जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर लगेचच कारमध्ये बसू नका. यामुळे देखील उलटी होण्याची शक्यता वाढू शकते.

तसंच प्रवासादरम्यानही चिप्स किंवा इतर तेलकट पदार्थ खाणं टाळा. यामुळे त्रास कमी होईल.

पुढील सीटवर बसा

जर तुम्हाला कार प्रवासादरम्यान मोशन सिकनेसचा त्रास जाणवत असेल तर योग्य सीट निवडणं गरजेचं आहे. यासाठीच मागील सीटवर न बसता फ्रंटसीटवर बसा. मागील सीटवर जास्त झटके जाणवतात. तसंच घाटामध्ये किंवा मोठ्या वळणांना त्रास होवू शकतो. यासाठी पुढील सीटवर बसा. पुढील सीटवर तुम्हाला हा त्रास कमी जाणवेल.

हे देखिल वाचा-

मोशन सिकनेस टाळण्यासाठी
Monsoon travel : पावसाळी सहलीसाठी उत्तम आहेत ही ठिकाणे

खिडक्या उघड्या ठेवा

कारमध्ये प्रवास करत असताना मोशन सिकनेस म्हणजेच मळमळणे किंवा उलटीचा त्रास जास्त जाणवत असल्यास एसी बंद करून खिडक्यांच्या काचा उघडा आणि ताजी हवा येऊ द्या. कारमध्ये जास्तीत जास्त ताजी हवा येऊ दिल्यास हा त्रास कमी होईल.

तसंच जर तुम्ही दूरचा प्रवास करत असाल तर काही तासांच्या अंतराने कारमधून खाली उतरून ताजी हवा घ्या. यामुळे तुम्हाला रिफ्रेश वाटेल.

मोबाईल पाहण्याएवजी दूरवर पहा

कारमध्ये प्रवास करत असताना मोबाईल पहाणं किंवा पुस्तक वाचणं टाळा. त्याएवजी कारमधून बाहेर दूरच्या वस्तू किंवा निसर्ग पहा. प्रवासात दिसणारे डोंगर किंवा दूरच्या गाड्या पहा. यामुळे मनाला आराम मिळून मोशन सिकनेसचा त्रास कमी होतो.

हायड्रेट रहा

प्रवास सुरु करण्यापूर्वी भरपूर पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल. तसचं प्रवासातही अधूनमधून थोडं थोडं पाणी प्या. एकाचवेळी जास्त पाणी पिणं टाळा. अन्यथा तुम्हाला वारंवार लघवीला आल्याने प्रवासात अडचण निर्माण होवू शकते.

लवंग किंवा आंबट गोळ्या

कार प्रवासात मोशनसिकनेसचा त्रास रोखण्यासाठी कायम काही लवंग सोबत ठेवा आणि एखादी लवंग चघळा. तुम्ही काही आंबट चवीच्या गोळ्याही देखील चघळू शकता. यामुळे मळमळ कमी होईल.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

कार प्रवासात तुम्हाला कायमच उलटी किंवा चक्कर येणं असा त्रास जास्त होत असल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने मोशन सिकनेसची औषधं घेऊ शकता. प्रवास सुरू करण्यापूर्वी १ तास ही औषध घेतल्यास मोशन सिकनेसचा त्रास होत नाही.

हे देखिल वाचा-

मोशन सिकनेस टाळण्यासाठी
Periods Tips While Travelling : प्रवास करताना मासिक पाळी येणं Irritate होतं यार? या टिप्स आजमवा आराम मिळेल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com