तुम्ही नवरा माझा नवसाचा भाग एक चित्रपट पाहिलाय ना. या चित्रपटात सचिन पिळगावकरांना सुप्रिया म्हणतात की, नवस फेडण्यासाठी चला ना गडे. यावर एक गाणंही चित्रपटात दाखवलं आहे. या डबल मिनिंग गाण्यासारखं आयुष्य खरोखर लोक जगत आहेत. म्हणजेच, आपल्या पृथ्वीवर एक असं गाव आहे जिथं लोक विवस्त्रच असतात.
संपूर्ण जगात मानव हा एकमेव प्राणी आहे जो कपडे घालतो, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजही पृथ्वीवर असे अनेक समुदाय आहेत जे कपडे परिधान करत नाहीत. अनेक आदिवासी समाज कपडे घालत नाहीत.
तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे असे का आहे? ते गरीब आहेत की त्यांच्याकडे कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत? उत्तर आहे, अजिबात नाही! या गावातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. परंतु तरीही ते कपड्यांशिवाय राहतात. या मागचे कारण काय आहे जाणून घेऊयात. (British culture)
ब्रिटनमधील हर्टफोर्डशायर येथे असलेले स्पीलप्लॅट्झ (Spielplatz Village In England ) नावाचे एक गाव वेगळेच आहे. या गावातील लोक 90 वर्षांहून अधिक काळ एक अनोखी परंपरा पाळत आहेत, ती म्हणजे - कपडे न घालण्याची. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे.
१९२९ मध्ये इस्युल्ट रिचर्डसन नावाच्या व्यक्तीने या गावाचा शोध लावला. त्याला ही जागा इतकी आवडली की त्याने इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आज या गावात एक पब, स्विमिंग पूल आणि क्लब देखील आहे.
या गावातील लोक सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, तरीही येथे लहान मुले, वृद्ध, महिला आणि पुरुष कपड्यांशिवाय आरामात राहतात. कारण ते एक परंपरा पाळत आहेत. ती म्हणजे या लोकांना असं वाटत की, कपडे घालणे म्हणजे पारतंत्र्यात असणं होय. कपडे न घालता राहणं हे इथल्या लोकांना स्वातंत्र्याची भावना देतं, असं इथल्या लोकांच म्हणणं आहे.
येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गावातील नियम पाळावे लागतात. विशेष म्हणजे खेड्यातील लोक शहरात गेल्यावर कपडे घालतात. पण गावात परत येताच ते नैसर्गिक स्थितीत परततात. येथे येणाऱ्या पर्यटकांनाही हा नियम पाळावा लागतो.
उन्हाळा असो की हिवाळा येथील लोकांना निसर्गाशी एकरूप वाटते. खूप थंड असताना कपडे घालण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर गावातील लोक बाहेर जाताना कपडे घालतात पण परत येताच कपडे काढावे लागतात. वृद्ध मानतात की या परंपरेमुळे त्यांना आंतरिक स्वातंत्र्य जाणवते.
हिवाळ्यात जेव्हा सर्वत्र थंडी असते तेव्हा इथल्या लोकांना कपडे घालण्याची परवानगी आहे. थंडीत आजारी पडू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन इथले लोक उबदार कपडे घालतात. पण इतरवेळी ते कपडे घालू शकत नाहीत. ऐकायला वेगळं वाटत असलं तरी या गावातील लोक ही अनोखी जीवनशैली अतिशय आरामात जगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.