Travel In Pune : प्रत्येक विकेंड बाहेर गावी किंवा शहराच्या बाहेर फिरायला जाणं होतंच असं नाही; अनेकदा घरासाठी किंवा स्वतःसाठी शॉपिंग करायची असते, पाहुणे आलेले असतात, घराची आवराआवर असते आणि यात बाहेर फिरायला जाता येत नाही.
पण अशातही तुम्ही पुण्यातल्या पुण्यात निवांत फिरुच शकतात ना? पुण्यात अशीच निवांत फिरण्याची अशी जागा म्हणजे पु ल देशपांडे गार्डन! सिंहगड रोड वरती अगदीच मोक्याच्या ठिकाणावर जवळजवळ 10 एकर मध्ये हे गार्डन पसरलं आहे.
जपानी उद्यान शैलीतलं गार्डन
या गार्डनची खाशियात म्हणजे, हे गार्डन जपानी उद्यानशैलीने तयार केलेलं आहे, सगळ्या शैलींपैकी जपानी उद्यानशैली ही खूप वेगळी आणि सुंदर ठरते. जपानी उद्याने त्यांच्या अभिरुचीपूर्ण नैसर्गिकता यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहेत.
हे होतं या गार्डनच पहिलं नाव
पु. ल. देशपांडे गार्डन हे जरी आत्ता या गार्डनच नाव असलं तरी याआधी या गार्डनच नाव "पुणे ओकोयामा मैत्री उद्यान" असं होतं. हे जपान मधील ओकोयामा शहरातील 300 वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन गार्डनप्रमाणे विकसित केलेले भारतातील एक गार्डन आहे.
गार्डनची रचना
पु.ल. देशपांडे गार्डन एकूण 10 एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पहावयास मिळावे अशी या गार्डनची रचना करण्यात आली आहे. या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचे झरे, टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो.
कॉफी, फूल झाडे आणि अशा विविध वैशिट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या शिवाय तुळस आणि त्याच्या सारख्या अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. गुलाब, तगरी पासून विविध शोभेची फुले या गार्डनचे सौंदर्य खुलवतात.
पाण्याचे झरे आणि विविध फुले यामुळे तऱ्हेतऱ्हेचे पक्षी येथे पाणी प्यायला आणि विसाव्याला येतात. पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक फोटोग्राफर्सचे पु.ल. देशपांडे गार्डन हे एक आवडते ठिकाण आहे.
या परिसरातील अनेक मंडळी रोज सकाळी व्यायाम करायला आणि सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी या गार्डनमध्ये येतात. या गार्डनची अजून काही वैशिट्यपूर्ण गोष्ट म्हणजे "मुघल उद्यान" हे गार्डन दिल्लीच्या राष्ट्रपती भवन मधल्या गार्डनची प्रतिकृती आहे.
या सिनेमांच झालेलं शूट
इथे सतत वेगवेगळे शूट होत असतात पण त्यातल्या त्यात सलमान खानच्या “बॉडीगार्ड” या सिनेमाच आणि मराठी सिनेमा दुनियादारीचही शूट इथेच झालेलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.