Travel Tips: अनेक लोकांना ऋतू कोणताही असो कधीही प्रवास करायला आवडतो. लाँग विकेंड आला की अनेक लोक लहान मुलांना घेऊन प्रवास करतात. अशावेळी लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही जर विमानाने प्रवास करत असाल तर मुलांची खास काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला प्रवासाचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर विमानाने प्रवास करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
लहान मुलांना विमानाने प्रवास कराना खुप मज्जा वाटते. पण विमानात प्रवासादरम्यान मुलांकडे लक्ष देणे गरजेचे असते. विमानतळ खुप मोठे असते, त्यामुळे तुम्ही मुलांना नेहमी सोबत ठेवावे. मुलांना गर्दीच्या ठिकाणी कधीही एकटे सोडू नका.
जर तुम्ही मुलांसोबत विमानाने प्रवास करत असाल तर मुलांची आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी. जसे की , मुलांचे पासपोर्ट, आधार कार्ड अशी सर्व कागदपत्रे सोबत ठेवावे. तसेच ज्या ठिकाणी जाणार आहात तिथले हवामान तपासावे, जर खुप थंडी असेल तर तर मुलांसाठी उबदार कपडे घ्यावे.
विमान प्रवासादरम्यान लहान मुलांचे सीट बेल्टकडे लक्ष द्यावे. विमानात बसल्यावर स्वत: सीट बेल्ट बांधा आणि मुलांना देखील सीट बेल्ट बांधावा. विमानाने प्रवास करण्यापूर्वी तुमच्या मुलांना विमानाची पुर्ण माहिती द्या.
प्रवासा दरम्यान मुलांची औषधे हँडबॅगमध्ये ठेवावी. कदी कधी लहान मुले विमानात घाबरतात अशावेळी त्यांना एनर्जी ड्रिंक देऊ शकता. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी किंवा पुस्तके सोबत ठेऊ शकता. ज्यामुळे मुले विमान प्रवासात शांत बसतील.
विमान प्रवासादरम्यान मुलांना वेळोवेळी पाणी देत राहावे आणि भूक लागल्यास दूध किंवा काही पदार्थ खायला द्यावे. तसेच मुलांच्या आवाजाचा इतर प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.