दिवाळी संपून आठ दिवस झाले तरी लोकांचा सुट्टीचा मूड अजून काही संपलेला नाही. दिवाळीनंतर थंडी पडू लागते आणि या दिवसात लोक फिरण्यासाठी बाहेर पडतात. पर्यटनासाठी उत्तम ऋतू असलेला हिवाळा अनेक लोकांच्या फायद्याचा ठरतो. कारण या सीझनमध्ये पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत असतात. याचा मोठा फायदा तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांना आणि राज्य पर्यटन विभागाला सुद्धा होतो.
कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाणं हा एक चांगला अनुभव आहे. पण काही वेळा ही ट्रीप म्हणजे डोकेदुखीठरू शकते. कारण आपण जर आपल्या सोबत योग्य वस्तू नेल्या नाहीत तर तुमची गैरसोय होऊ शकते.