Triyuginarayan Temple History : शिव-पार्वतीने या मंदिरात केलंय लग्न; लग्न अविस्मरणीय बनवायचं असेल तर इथेच घ्या साथ फेरे

सात जन्म तोच जोडीदार हवा असेल तर या मंदिरात करा लग्न
Triyuginarayan Temple History
Triyuginarayan Temple HistorySakal Digital 2.0
Updated on

Triyuginarayan Temple History : शिव पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने कठोर तपश्चर्येनंतर शिव पुन्हा आपल्या पतीच्या रूपात प्राप्त केला होता. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने एक चांगला आणि इच्छित जीवनसाथी मिळतो, अशी श्रद्धा आहे. तसे पाहता महादेव आणि माता पार्वतीच्या भेटीबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. पण त्याने कोणत्या ठिकाणी सप्तपदी पूर्ण केली होती. त्यामुळे क्वचितच तुम्हाला ठाऊक असेल.

अशा परिस्थितीत आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शिव-पार्वतीचे विवाहस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिराविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. पवित्र त्रियुगीनारायण मंदिर उत्तराखंडच्या रुदप्रयाग जिल्ह्यात आहे. असे म्हणतात की याच ठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता.

मंदिराबाहेरील सभामंडपातील हवनकुंडात अग्नी सतत धगधगत असतो. मंदिराच्या पुजाऱ्यांच्या मते ही तीच अग्नी आहे ज्याभोवती शिव-पार्वती विवाह झाला होता.

Triyuginarayan Temple History
Worlds Tallest Shiva Statue : जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

हिमालयाच्या पायथ्याशी दाेन हजार मीटर उंचीवर ज्या मंदिरात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते, ताे परिसर आता विवाहस्थळ म्हणून उदयास येत आहे. येथे दरवर्षी २०० हून अधिक विवाह आयोजित हाेतात. हे मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. तीन युगांपासून येथील अग्निकुंड अखंड प्रज्वलित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मंदिराचे नाव त्रियुगीनारायण पडले.

असे मानले जाते की या मंदिरात अग्नी प्रदक्षिणा केल्याने पती-पत्नी जन्मजन्मांतरीचे सहचर होतात. विवाहांचे आयोजन करणारे पंकज गायरोला सांगतात की, पूर्वी फक्त आजूबाजूच्या गावांतील लोकच विवाह करत. पण येथील व्हिडिओ पाहिल्यानंतर २०१५ पासून देश-विदेशातील विवाहेच्छुकांची संख्या वाढली.

आता स्थिती अशी आहे की इथे विवाहासाठी रांगा लागल्या असून तारीख मिळणे अवघड झाले आहे. बुधवारीच गुजरात, महाराष्ट्र आणि डेहराडून येथील कुटुंबीय लग्नासाठी आले होते. एका दिवसात फक्त तीन विवाह लावण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे मंदिराचे पुजारी आणि ग्रामस्थ इच्छुकांना नंतर लग्न करण्याचा सल्ला देत आहेत.

Triyuginarayan Temple History
Worlds Tallest Shiva Statue : जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?
वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे हे मंदिर
वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे हे मंदिरesakal

विष्णू हाेते माता पार्वतीचे बंधू


येथे शिव-पार्वती विवाहात, विष्णूंनी माता पार्वतीचा भाऊ म्हणून सर्व विधींमध्ये सहभागी झाले, तर ब्रह्मदेव या विवाहासाठी पुजारी हाेते. विवाह स्थळासाठी निश्चित केलेल्या जागेला ब्रह्मशिला म्हणतात, जी मंदिरासमोर आहे.

या मंदिराच्या महात्म्याचे वर्णन पुराणातही आढळते. लग्नापूर्वी सर्व देवतांनीही येथे स्नान केले होते त्यामुळे येथे तीन कुंड बनविण्यात आली. ती रुद्रकुंड, विष्णुकुंड आणि ब्रह्मकुंड नावाने आेळखली जातात. या तिन्ही तलावांतील पाणी सरस्वती कुंडातून येते.

Triyuginarayan Temple History
Lord Shiva Temples: महाराष्ट्रातील 12 प्रसिद्ध शिव मंदिरे

शतकानुशतके धुमी धगधगत आहे

पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही अग्नी अनेक युगांपासून तेवत आहे. यामुळेच हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. या मंदिरात लग्नासाठी अनेक जोडपी दूरदूरवरून खास येतात.

येथे लग्न करून जन्म सुखी होतो

या अद्भूत मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की येथे लग्न करणाऱ्या जोडप्याचे आयुष्य चांगले होते. त्यांच्या वैवाहिक जीवनात कधीही तणाव नसतो. यासोबतच सुखी वैवाहिक जीवनाचे वरदानही मिळते. आजही या मंदिरात शिव-पार्वतीच्या विवाहाच्या खुणा आहेत.

हे खास मंदिर उत्तराखंडमध्ये आहे
हे खास मंदिर उत्तराखंडमध्ये आहेesakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.