ट्रिपला गृपने बाहेर गेलात किंवा तूम्ही जोडीदारासोबत गेलात. तर तिथे हॉटेलमध्ये एकत्र रहायचं म्हटलं तर अनेक प्रश्न आपल्या डोक्यात येतात. कारण, आपला कायदा तशी परवानगी देतो का?, याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. तर असे एकत्र राहिलात तर पोलीस पकडतील अशी भितीही असते. त्यामूळे नक्की काय करावे कळत नाही. (Hotel Rules For Unmarried Couples)
केवळ हॉटेल नाही तर एखाद्या सुनसान रस्त्यावर आणि गार्डनमध्ये फिरतानाही अनेक लोक कपल्सकडे संशयाच्या नजरेने बघतात. अनेक बातम्या येतात ज्यात अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये त्रास दिला जातो किंवा त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात नाही. तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात जोडपे बागेत बसतात आणि पोलीस किंवा इतर लोक त्यांना त्रास देतात. अशा परिस्थितीत अनेकांना हेच कळत नाही की, अशी परिस्थिती उद्भवल्यास काय करावे?
खरंतर अनेकवेळा अनेक अविवाहित जोडपे अशा परिस्थितीतून जातात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, जोडप्यांना काही नियम माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही अशा परिस्थितीतून वाचू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही नियम सांगत आहोत, जे प्रत्येक अविवाहित जोडप्याला माहित असले पाहिजेत.
हॉटेलमध्ये राहण्याचा अधिकार
कोणतेही हॉटेल अविवाहित जोडप्यांना राहण्यापासून रोखू शकत नाही. अविवाहित जोडप्यांना एकाच खोलीत राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यांच्याकडे फक्त वैध ओळखपत्र असणे आवश्यक आहे. वैध आयडी प्रूफ दिल्यानंतर, हॉटेल व्यवस्थापन खोली देण्यास नकार देऊ शकत नाही. जर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला तर जोडपे पोलिसांना त्यांच्या नात्याबद्दल सांगू शकतात आणि ओळखपत्र देखील दाखवू शकतात.
सार्वजनिक ठिकाणी बसू शकतात?
अविवाहित जोडपे सार्वजनिक ठिकाणी बसले तर त्यांना कोणीही त्रास देऊ शकत नाही. होय, परंतु सार्वजनिक ठिकाणी कोणी अश्लील कृत्य करताना आढळल्यास त्याला 3 महिन्यांची शिक्षा होऊ शकते. हा नियम आयपीसीच्या कलम २९४ मधील आहे. लक्षात ठेवा की या कलमाचा अनेकदा गैरवापर केला जातो. त्यामुळे अविवाहित जोडप्यांना त्रास दिला जातो.
जर तूम्ही एकाच शहरातील असाल
एकाच शहरातील जोडपे हॉटेलमध्ये राहू शकतात. असा कोणताही कायदा नाही ज्यामध्ये एकाच शहरातील अविवाहित जोडप्यांना राहण्याची परवानगी नाही. परंतु काही गुन्हे घडू नयेत आणि हॉटेलची बदनामी होऊ नये यासाठी काही हॉटेल मालक एकाच शहरातील लग्न न झालेल्या जोडप्यांना राहण्याची परवानगी देत नाहीत.
पोलिस जोडप्यांना अटक करतात
पोलीस अशा जोडप्यांना अटक करू शकत नाहीत. जे 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. आणि त्यांच्याकडे वैध ओळखपत्र असेल तर ते हॉटेलमध्ये बिंधास्त राहू शकता.
तूम्ही घरही घेऊ शकता
सध्या लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत आहे. त्यामूळे जर तूम्ही हॉटेल किंवा लॉज ऐवजी घरच भाड्याने घेणार असाल तर तूम्ही अविवाहीत आहात म्हणून अडचण येत नाही. केवळ तूमच्याकडे भाडे करार असणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.