पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! 'हा' किल्ला 16 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद; नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई

बंद कालावधीत वासोट्यावर कोणी गेल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे.
Vasota Fort
Vasota Fortesakal
Updated on
Summary

बामणोली परिसरातील सर्व पर्यटन व्यावसायिक व बोट क्लबनाही याबाबतची सूचना वनविभागाने दिली आहे.

सातारा : निसर्ग व दुर्गप्रेमींना नेहमीच खुणावणारा घनदाट जंगलाचा दुर्गम वासोटा किल्ला (Vasota Fort) आजपासून १६ ऑक्टोबरपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, १६ ऑक्टोबरनंतर पावसासह तत्कालीन स्थिती पाहून तो पुन्हा खुला केला जाणार आहे.

बंद कालावधीत वासोट्यावर कोणी गेल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे. याबाबतची माहिती बामणोलीचे वन्याजीवचे वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांनी दिली.

शिवसागरापलीकडे सातारा जिल्ह्यातील घनदाट कोयना अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील (Sahyadri Tiger Reserve) बामणोली परिक्षेत्रात वासोटा हा वनदुर्ग आहे. व्याघ्रगड हे या किल्ल्याचे दुसरे नाव आहे. घनदाट झाडी, कठीण चढण यामुळे साहसी गिर्यारोहकांना हा किल्ला नेहमीच खुणावत असतो. किल्ल्यावर पाण्याची टाकी, राजवाड्याचे अवशेष, शिवमंदिर आहे आणि बाबूकडा नावाने ओळखला जाणारा मोठा किनारा हे त्याचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहे.

Vasota Fort
Solapur : डोळ्यांदेखत संसार उद्ध्वस्त; चिमणी जमीनदोस्त होताच अपंग कामगाराच्या पत्नीनं फोडला टाहो

या परिसरात झाडी, विविध प्राणी, पक्षी असल्याने सर्वच निसर्ग अभ्यासकांनाही वासोट्याचे आकर्षण असते. त्यामुळे पर्यटनाचा पावसाळ्यानंतर हंगाम सुरू होताच पर्यटकांना (Tourists) वासोट्यावर जाण्याचे वेध लागतात. मात्र, पावसाळ्यात तेथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. वारेही जोराने वाहतात. शिवसागर जलाशय तुडुंब भरू लागतो. या काळात जलाशयात जाणेही धोकादायक ठरू शकते.

Vasota Fort
Karnataka : पाठ्यपुस्तकांतून सावरकर, हेडगेवारांचे धडे वगळले; पुस्तकात फुले, आंबेडकरांचा केला समावेश

बामणोली परिसरातील सर्व पर्यटन व्यावसायिक व बोट क्लबनाही याबाबतची सूचना वनविभागाने दिली आहे. पुढील पर्यटन हंगाम सुरू होण्याविषयीच्या सूचना पावसाळ्यानंतर वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशांप्रमाणे देण्यात येतील. १६ ऑक्टोबरपर्यंत वासोटा येथे कोणी प्रवेश केल्याचे आढळल्यास प्रचलित कायदा व नियमांप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वन विभागाने दिला आहे.

Vasota Fort
Satara : दिवसाढवळ्या, रात्री-अपरात्री कोयता-तलवारी नाचवणाऱ्यांचा बंदोबस्‍त करणार का? उदयनराजेंचा संतप्त सवाल

जून ते ऑक्टोबर हा कालावधी बहुतांश वन्य प्राण्यांचा प्रजननचा कालावधी असतो. या काळात पर्यटक वासोटा किल्ल्यावर आल्यास वन्य प्राण्यांना ते अडचणीचे ठरू शकते. त्याचप्रमाणे परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. अतिपावसामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघात घडू शकतात. ते टाळण्यासाठी या कालावधीत वासोटा पर्यटनासाठी बंद ठेवला आहे.

- बाळकृष्ण हसबनीस, वनक्षेत्रपाल, वन्यजीव, बामणोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.