४५ हजारात करा बाली,इंडोनेशियाची ट्रिप

काहीजण पैसे साठवून एकदा तरी परदेशात अशी ट्रिप प्लॅन करतात
indonesia country
indonesia countrysakal
Updated on

लोकांना परदेशात फिरायला खूप आवडतं. ज्यांच्याकडे पैसे आहेत असे लोकं वर्षातून एक तरी फॉरेन ट्रीप (International Trip) करून येतातच. पण ज्यांना पैशांअभावी (Money) जाणं शक्य नाही ते पैसे साठवून एकदा तरी अशी ट्रिप करतातच. तुम्हाला ४५ हजारात बाली, इंडोनेशियाची ट्रिप करायची असेल तर तसे काही पर्याय आहेत. सुट्ट्यांमध्ये तुम्ही अशी ट्रीप प्लॅन करू शकता. पण यासाठी तुमच्या ट्रॅव्हल एक्सपर्टचा सल्ला मात्र नक्की घ्या.

Tips for Travelling Abroad
Tips for Travelling Abroad Esakal

विमान प्रवास : साधारण INR 22,000

पर्यटनाला (Tourisam) जाताना विमान प्रवास करणे अनेकांना आवडते. त्यामुळे बालीला (Bali) विमानाने जायचे असेल तर, मुंबई, बंगलोर आणि नवी दिल्ली यांसारख्या शहरांशी जोडणारी अनेक फ्लाईट्स आहेत. वन-हॉल्‍ट, दोन-हॉल्‍ट्स आणि गरुड इंडोनेशिया द्वारे संचालित मुंबई ते बाली या नुकत्याच सुरू झालेल्या थेट फ्लाइटपर्यंत अनेक पर्याय आहेत. सर्वात स्वस्त भाडे हवे असेल तर सहलीचे लवकर नियोजन करणे आणि किमान दोन ते तीन महिने आधी फ्लाइटचे बुकिंग करा. फ्लाईटचे बुकिंग कसे सुरू आहे, दर काय आहेत याबाबत तुम्हाला रोजच विविध वेबसाईटवर माहिती मिळेल.

indonesia country
मलायका, अर्जूनसारखं मालदिवला जायचंय, कमी बजेटमध्ये असे फिरा
visa
visa

फुकट व्हिसा

सुंदर समुद्रकिनारे, जुनी देवळे आणि निसर्गरम्य ठिकाणे बघण्याची संधी तुम्हाला बाली,इंडोनेशियात मिळू शकते. यासाठी तुम्हाला व्हिसा प्रक्रिया किंवा त्यासाठी शुल्क देण्याची गरज नाही. भारतीय पासपोर्टवर तुम्ही बालीला जाऊ शकता. मात्र, तुमचा पासपोर्ट कमीत कमी सहा महिन्यांसाठी वैध आहे आणि स्टँपिंगसाठी जागा आहे याची खात्री करायची आहे. हा व्हिसा ऑन अरायव्हल फक्त ३० दिवसांसाठी वैध आहे.

indonesia country
'वर्क फ्रॉम होम' करतानाच करा पिकनिक
hotel
hotelRepresentative Image

हॉटेल्स- साधारण INR6,000

बाली, इंडोनेशियात मध्ये बजेट कमी असलेल्यांसाठी होमस्टे हा पर्याय अतिशय चांगला आहे. याशिवाय बजेट हॉटेल्स, वसतिगृहे हेही पर्याय आहे, तुम्ही बालीमध्ये प्रति रात्र सुमारे INR800-INR1,000 मध्ये अपार्टमेंट (सामायिक पूल आणि नाश्ता) मिळवू शकता.

फूड - साधारण INR3,000

बाली, इंडोनेशियात खाण्याची चंगळ आहे. पण इथे स्वच्छ हॉटेल्समध्ये खा.

एका रेस्टॉरंटमध्ये साधारण IDR45,000 (सुमारे INR200) खर्च येईल. स्थानिक बीटच्या एका पिंटची किंमत सुमारे IDR20,000 (INR100) आहे. शाकाहारींना काही भागात अडचणी येऊ शकतात.

indonesia country
कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी या आहेत 4 बेस्ट रोड ट्रिप
Travel
Travel

वाहनाने प्रवास - साधारण INR4,000

बालीमध्ये प्रवासाचे अनेक पर्याय आहेत. बेमो, टॅक्सी, सायकली, मोटारसायकल आणि कारने तुम्ही प्रवास करू शकता.बजेट ट्रीपमध्ये तुम्हाला ब्लू बर्ड टॅक्सी हा एक उत्तम पर्याय आहे. साधारणपणे, भाडे IDR5,000 (INR25 च्या आसपास) आणि नंतर प्रत्येक किलोमीटरसाठी IDR2,500 पासून सुरू होते.

हे लक्षात ठेवा

या खर्चाव्यतिरिक्त तुमचा अधिक खर्च हा खरेदी, खाणे किवा इतर गोष्टींसाठीही होऊ शकतो. मात्र त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. एकटे किंवा कुटुंबासह जायचे असेल तर तसे प्लॅनिंग करून कमीतकमी खर्चात तुम्ही बाली, इंडोनेशियाला जाउ शकता. मात्र त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.