Best Solo Trip Destinations for Female : महिला दिन म्हटल्यावर सेलिब्रेशन तो बनता है... पण सगळ्यांसोबत बसून फक्त केक कट करण्या पल्याडही तुम्ही काही गोष्टी करुच शकतात. आज जरा घराचं टेंशन बाजूला ठेवा, ऑफिसमधून सुट्टी काढा आणि आपली बॅग भरा आणि निघा आपल्या सोलो ट्रीपला.
माहीती आहे जरा कठीण आहे... पण ठिके ना. फार लांब जाण्याची इच्छा नाही, हरकत नाही.. ट्राय करा ही पुण्या-मुंबई जवळची बेस्ट सोलो ट्रीप डेस्टीनेशन्स. अनेकदा महिला इथे जाणं पसंत करतात आणि ही ठिकाणे तशी महिलांसाठी सेफ सुद्धा आहेत.
१. कर्णाळा किल्ला
पक्षी पाहणे ही तुमची आवड असेल किंवा तुम्हाला हिरवळ, पर्वत आणि त्यांच्यावर तरंगणारे धुके आणि ढग आणि त्यांच्या कड्यावरून खाली कोसळणारे धबधबे यांची सुंदर दृश्ये पाहण्यात तुमचा वेळ घालवायला आवडत असेल, तर तुम्हाला कर्नाळ्यापेक्षा सुंदर जागा सापडणारच नाही.
२. दुरशेत
दुरशेत तसं मुंबईपासून जरा दूर आहे, पण ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात वेळ व्यतित करणं आणि जरा थ्रीलिंग एक्सपिरियंस घेणं आवडतं अशांसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. इथे तुम्हाला अंबा आणि कुंडलिका या नद्याही सापडतील, ज्यात तुम्ही रॅपलिंग, वॉटर रॅफ्टिंग आणि रिव्हर क्रॉसिंगसुद्धा करु शकतात.
३. खंडाळा
खंडाळा आणि लोणावळा ही दुहेरी हिल स्टेशन्स आहेत, हायकिंग, ट्रेकिंग, गिर्यारोहण, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंगमध्ये स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी खंडाळा हे परफेक्ट ठिकाण आहे. टायगर्स लीप, अमृतांजन पॉइंट आणि ड्यूक नोज ही इथली फेमस ठिकाणे आहेत.
४. कामशेत
तुम्ही उत्साही असाल किंवा अनुभवी पॅराग्लायडर असाल, कामशेतला जा. पॅराग्लायडिंग करु इच्छिणाऱ्या लोकांसाठी इथे शाळा आहे, ज्या नवशिक्यांना प्रशिक्षित करतात. निसर्ग स्वतःच वेगवेगळे पर्याय ऑफर करतो, शिंदे टेकडी नवशिक्यांसाठी आणि शेलार आणि टॉवर हिल अधिक अनुभवी लोकांसाठी आहे.
५. मुळशी
मुळशी धरणाचे निर्मळ सौंदर्य अतुलनीय आहे. जर निसर्गप्रेमी असाल, तर तुम्हाला या निसर्गरम्य परिसरांनी वेड लावाल. मुळशी तलावाचे सौंदर्य आणि उत्कृष्ट हवामानामुळे तुम्हाला तुमच्या वेळेचा आनंद लुटता येतो. वरसगाव धरण, टेमगड धरण आणि पानशेत ही मुळशीच्या आसपासची काही मनोरंजक ठिकाणे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.