Fashion Tips : मेकअप, दागिने अन्....; गोव्यात चुकूनही 'या' गोष्टी घालून जाऊ नका, फजिती होईल!

गोव्याला जाताना काय सोबत न्यायचं यापेक्षाही काय न्यायचं नाही, हे महत्त्वाचं. याच विषयीच्या या काही टिप्स.
Goa Trip
Goa TripSakal
Updated on

सध्या फिरण्याचा, सुट्ट्यांचा सीझन आहे. सुट्टी म्हटलं की अनेकांची पावलं गोव्याकडे वळतात. रोजच्या धावपळीतून थोडीशी विश्रांती म्हणून गोव्याकडे जायचं, गोवा एक्सप्लोअर करायचं, अशी अनेकांची इच्छा असते. पण गोव्यात नक्की काय घेऊन जायचं, कसे कपडे घालायचे या गोष्टीबद्दल अनेकांना प्रश्न पडतात.

गोव्याला जायचं, फिरायचं म्हणजे सामानही तसं लिमिटेड न्यायला हवं. नाहीतर नुसतं सामान सांभाळत बसावं लागेल. म्हणूनच जेव्हा तुम्ही गोवा ट्रिपसाठी पॅकिंग कराल, तेव्हा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. गोव्याला काही तुम्ही रोज घालता तसे कपडे घालून जाणार नाही. थोडंसं काहीतरी वेगळेपण सगळ्यांना आवडतं.

Goa Trip
Weekend Trip : सुट्टी वाया घालवू नका; कमी खर्चात कधीही न पाहिलेल्या जागा पाहा!

गोव्याला जाताना काय सोबत न्यायचं यापेक्षाही काय न्यायचं नाही, हे महत्त्वाचं. याच विषयीच्या या काही टिप्स.

जीन्स

गोव्याला जात असाल तर चुकुनही जीन्स सोबत नेऊ नका, किंवा फिरतानाही परिधान करू नका. समुद्रामुळे तिथलं वातावरण दमट असतं. त्यामुळे घाम येणं, उकडणं हे तिथे नॉर्मल आहे. घट्ट जीन्समुळे तुमच्या त्वचेला श्वास घेता येणार नाही, तसंच तुम्ही अस्वस्थ राहाल.

शिवाय, समुद्रात भिजायला जातानाही जीन्स घालून जाऊ नका. पाण्याने जीन्स जड होते, रेती खिशांमध्ये अडकते, त्यामुळे अस्वस्थ होऊ शकते.

Goa Trip
Goa Trip : आता गोवा ट्रिपवर खर्च नाही कमाई होईल... कशी? या आहेत टिप्स

सिथेंटिक कापड

पॉलिस्टर, नायलॉन किंवा लेदरचे कपडे गोव्याला जाताना नेऊ नका. तिथे असे कपडे न घालणे योग्य ठरेल.

अंडरवेअर झाली स्विमसूट

तुमची अंतर्वस्त्रे हा स्विमसूट होऊ शकत नाही. अंडरवेअर घालून समुद्रात जाऊ नका. तिथे जाण्यासाठी स्विमसूट वापरा. पण केवळ अंतर्वस्त्र घालून समुद्रात जाऊ नका.

उंच टाचेच्या चपला

जसा ब्रेक तुम्हाला हवा असतो, तसाच तुमच्या पायांनाही हवा आहे. त्यामुळे नेहमी जशा उंच टाचेच्या चपला वापरता, तशा वापरू नका. शिवाय, बीचवर जाताना उंच टाचेच्या चपला घालून जाणं शक्य होणार नाही. बीचवर चालता येणार नाही, त्यामुळे सपाट टाचेच्या चपला घाला.

दागिने

आपल्यासोबत दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तू बाळगू नका. समुद्रात किंवा रेतीमध्ये दागिने हरवण्याची भीती आहे. त्यामुळे सोबत नेताना महागड्या वस्तू नेऊ नका.

Goa Trip
Trip With Family : म्हणून सांगतोय, वर्षातनं एक तरी ट्रिप फॅमिलीसोबत केलीच पाहिजे!

मेकअप

गोव्यातलं समुद्राचं पाणी आणि हवामान तुमचा मेकअप पूर्णपणे खराब करू शकतं. त्यामुळे कमीत कमी मेकअप करा. केस शक्यतो वर बांधून ठेवा. तुम्ही थोडीशी लिपस्टिक आणि हलकंसं आय लाइनर लावू शकता.

हेअरड्रायर

दमट हवामान, समुद्राचं खारं पाणी यामुळे तुमचे केस कोरडे होतात आणि तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांवर आणखी काही प्रयोग करू नका. हेअरड्रायर न वापरता नैसर्गिकरित्या केस सुकू द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.