प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये राहताना कोणत्या चुका टाळाव्यात?

एका महिलेने अशाच काही गोष्टी उघड केल्या आहेत.
प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये राहताना कोणत्या चुका टाळाव्यात?
Updated on
Summary

एका महिलेने अशाच काही गोष्टी उघड केल्या आहेत.

अनेकवेळा आपण प्रवासादरम्यान बऱ्याच गोष्टी विसरतो. वेळेअभावी पॅकिंग करत असताना काही महत्वाच्या गोष्टी विसरून जातो आणि मग पर्यायी गोष्टींचा वापर करतो. प्रवासवेळी आपण हॉटेल बुक करतो मात्र तेथील काही बारीक सारीक गोष्टी पाहत नाही. दरम्यान, एका महिलेने अशाच काही गोष्टी उघड केल्या आहेत. या काही महत्वाच्या गोष्टी आपण सहसा हॉटेलच्या खोल्यांमध्ये पाहत नाही.

प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये राहताना कोणत्या चुका टाळाव्यात?
दातदुखीमुळे खाणे-पिणे झाले कठीण; 'हे' घरगुती उपाय केल्यानं मिळेल आराम

आपल्याला वाटतं असत की, हॉटेलमधील खोल्या पूर्णपणे स्वच्छ आणि साफ आहेत. परंतु तसे नसते. सोशल मीडियावरील एका सोशल एॅपच्या वापरकर्त्याने हॉटेलच्या खोल्यांमधील अशा काही गोष्टींकडे लोकांचे लक्ष वेधले आहे. जर तुम्ही हॉटेलमध्ये रहात असाल तर फक्त बंद बाटलीतील पाणी पिण्याचा प्रयत्न करा. कारण हॉटेलच्या खोलीत ठेवलेले ग्लास इतरांनी वापरलेल किंवा अस्वच्छ असण्याची शक्यता असते. सहसा ते दररोज स्वच्छ केले जात नाहीत.

हॉटेलच्या टेरेस, बाल्कनी किंवा खिडकीवर अनवधानाने उभे राहू नका. ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. हॉटेलमधून मिळणारे 'पूरक अन्न' न खाण्याचा सल्लाही अनेकजण देत असतात. याशिवाय हॉटेलचा वाय-फाय वापरणेही टाळावे. कारण यामुळे तुमचा महत्वाचा डेटा चोरी होण्याची शक्यता असते. अशावेळी आवश्यक असल्यास तुम्ही VPN चा वापर करु शकता त्यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहील.

प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये राहताना कोणत्या चुका टाळाव्यात?
Yoga : दिवसभर रहाल आनंदी अन् एनर्जेटिक, फक्त तीन आसनं करा, मूड राहील फ्रेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.