हिवाळी पर्यटनाची लगबग; काश्मीरला सर्वाधिक पसंती

हिवाळी पर्यटनाची लगबग; काश्मीरला सर्वाधिक पसंती
Updated on

नागपूर : टाळेबंदीच्या काळात सर्वाधिक फटका बसलेला पर्यटन व्यवसायास सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. कारण, पर्यटनाला जाण्यासाठी लोक आतापासूनच नियोजन करू लागलेले आहेत. हिवाळी पर्यटनाबद्दल काश्मीरसह इतरही महत्त्वाच्या स्थळांबद्दल सतत विचारणा होऊ लागली आहे. गोवा, कोकण, थंड हवेची ठिकाणे आणि जंगल भ्रमंतीकडे कल वाढू लागला असून, हे पर्यटन स्थळेही सज्ज होत आहे. यामुळेच सहल आयोजकांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे. सहलींची तयारी प्राथमिक सुरू झालेली आहे, असे आयोजकांचे म्हणणे आहे.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे त्रस्त झालेल्या लोकांना आणि पर्यटकांना शासनाने काहीसा दिलासा दिला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने टप्प्याटप्याने अनलॉक ची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळेच हळूहळू पर्यटन स्थळे अनलॉक होत आहेत. आगामी काळात आता पर्यटनास बहर येणार आहे.

हिवाळी पर्यटनाची लगबग; काश्मीरला सर्वाधिक पसंती
डोहात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी आढळला मृतदेह

मागील वर्षी आणि यावर्षीही कोरोना महामारीमुळे घरी राहून त्रस्त झालेल्या पर्यटकांना आणि लहानथोरांना आता मनमोकळा पर्यटन करता येणार आहे. मागील काही कालावधीपासून कोरोनाचा प्रकोप वाढल्याने आधी संचारबंदी आणि मग लॉकडाउन सुरू झाल्याने पर्यटन बंद होते. पर्यटनस्थळे पर्यटकांविना सुनी पडली होती.

सध्या राज्यात मॉन्सून अंतिम टप्प्यात आला असून, सर्वत्र निसर्गाने हिरवी शाल पांघरली आहे. त्यामुळे हिरव्यागार डोंगररांगा आणि निसर्गरम्य समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावत आहेत. निसर्गाचे मनमोहक रूप मनात साठविण्यासाठी पर्यटक निसर्ग रम्य, दऱ्या डोंगरावर भटकंती करण्यासाठी बाहेर पडू लागलेले आहेत.

हिवाळी पर्यटनालाही पर्यटक पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. टाळेबंदीमुळे सक्तीने घरातच बसावे लागलेला वर्ग खुपच कंटाळला होता. हा सर्व वर्ग आता वर्षा पर्यटनाचा तसेच हिवाळी पर्यटनाचा बेत आखत आहे. दमदार पावसामुळे निसर्गाने मनमोहक अशी हिरवाई वाढली आहे. त्यातच आगामी हिवाळी हंगाम येणार असल्याने त्यासाठी आतापासूनच नियोजन पर्यटकांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

हिवाळी पर्यटनाची लगबग; काश्मीरला सर्वाधिक पसंती
शाळेत जाण्यासाठी निघालेला विद्यार्थी नाल्यात गेला वाहून
दिवाळीच्या सुट्‍ट्यांसाठी नोकरदार वर्ग आणि पर्यटन व्यावसायिक ही पर्यटनाचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी पर्यटन कंपन्या तयारीला लागलेल्या आहेत. कोरोना नियंत्रणात राहिल्यास ऑक्टोबर, डिसेंबरपासून पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरू होणार आहे. हिवाळी काश्मीरचे पर्यटन हाऊसफुल्ल झालेले आहे. देशांतर्गत पर्यटनाला जाण्यासाठी पर्यटक तयारीला लागले आहेत.
- अनुराग गुप्ता, संचालक, आयआयटीसी
हिवाळी पर्यटनासाठी पर्यटकांची विचारणा होऊ लागली आहे. लसीकरणाचा वेग वाढल्याने नागरिकांचा आत्मविश्वासही वाढलेले आहे. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनाला नक्कीच बुस्ट मिळणार आहे.
- संजय देशपांडे, टूर ऑपरेटर असोसिएशन, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()