Winter Travel Tips: भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. तुम्हाला भारतात प्रत्येक ऋतूत काहीतरी खास पाहायला मिळेल. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी गुलाबी थंडीचा आनंद घेता येतो. तर अनेक ठिकाण चेरी ब्लॉसमच्या सुंदर दृश्यांनी नटलेली असतात.
हिवाळ्यात अनेक लोकांना भटकंती करायची आवड असते. अनेक लोक चेरी ब्लॉसमचा आनंद घेण्यासाठी जपान किंवा कोरियाला जातात. पण तुम्हाला माहिती आहे का भारतात देखील असे काही ठिकाण आहेत जिथे तुम्ही चेरी ब्लॉसमचा आनंद घेऊ शकता. चेरी ब्लॉसमला जपानी भाषेत सकुरा म्हणतात. यामुळे भारतात फुलणाऱ्या चेरी ब्लॉसमला इंडियन साकुरा म्हणतात. तुम्हीही यंदा चेरी ब्लॉसमचा आनंद घेण्याचा विचार करत असाल तर भारतातील नयनरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता.