दसऱ्यानंतर थंडी पडायला सुरूवात होते. सुरूवातीची असणारी थोडी-थोडी थंडी गुलाबी प्रेमाची वाटते. त्यामुळे या थंडीत फिरायला जाण्याची मजा काही वेगळीच असते. कारण, हा ऋतू प्रेमाचा मानला जातो. तसाच, तो फिरण्याचाही असतो.
थंडीमध्ये विशेषत: बर्फवृष्टी असलेल्या ठिकाणी मित्र, कुटुंब आणि जोडीदारांसोबत मजा करण्यात एक वेगळीच मजा असते. पण, भारतात असे काही लोक आहेत ज्यांना हिवाळ्याच्या काळात काही विशेष ठिकाणी भेट द्यायला आवडते. (Diwali 2024)
जर तुम्हाला अशा ठिकाणी जायचे असेल जिथे जास्त थंडी नसते, तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही थंडीचा आनंद लुटू शकतो.
जयपूरला गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं. कारण, इथल्या संस्कृतीचे लोक चाहते आहेत. इथे अनेक पुरातन किल्ले अन् वास्तू आहेत. जिथे लोक राजेशाहीचा थाट अनुभवू शकतात.
प्रेमाचे प्रतिक असलेला ताज महाल जोडीदाराच्या साक्षीनं पाहण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. कारण, ही भव्य वास्तू प्रेमाची साक्ष देतो. जो प्रेमाच्या कोमलतेसारखा नितळ शुभ्र आहे. दिल्लीतील थंडी जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे या गुलाबी थंडीत जोडीदाराला घेऊन ताजमहाल पाहण्याचा प्लॅन नक्की करा.
उत्तराखंडला देवभूमी म्हणून ओळखले जाते. कारण, इथे अनेक अशी मंदिरे आहेत जी तुम्हाला स्वत:शी एकरूप होण्यास मदत करतील. इथल्या शांत ठिकाणी फिरणं, राहणं तुम्हाला सुखद अनुभव देणारं ठरू शकतं.
राजस्थानमधील उदयपूरला प्रेमाचं शहर म्हणतात. कारण, इथे असलेले वातावरण अन् नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारे ठरू शकतात. त्यामुळेच, जोडीदारासोबत इथे असलेल्या पिचोला सरोवरामध्ये नौकाविहार करण्याचा सुखद अनुभव प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. तुम्हाला इथे राजस्थानी पारंपरिक वेशभूषा करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.