Womens Tour : मैत्रिणींनो, इथे फिरा,खा मज्जा करा, हे आहेत तुमच्यासाठी सर्वात सुरक्षीत देश!

भिती अन् टेन्शन बाजूला सारून बिनधास्त फिरा या देशात
Solo Trip
Solo Trip esakal
Updated on

Solo Trip :

महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाहीत. ती सर्व कामे खांद्याला खांदा लावून करत आहे, जे फक्त पुरुषच करू शकतात असे पूर्वी सांगितले जात होते. त्याचप्रमाणे आजकाल महिलांनाही एकट्याने प्रवास करायला आव डते. पण जेव्हा कधी घरी एकट्या महिलेने प्रवास करण्याची चर्चा होते. तेव्हा पहिल्यांदा तिच्या सुरक्षेचा मुद्दा येतो.

एक काळ असा होता की स्त्रिया पुरुषाशिवाय घराबाहेर पडत नसत. पण आज अशी वेळ आली आहे जेव्हा महिला एकट्याने परदेश प्रवास करण्याचा विचार करतात. झिम्मा या मराठी चित्रपटातील महिलाही बिनधास्त परदेशवारी करत आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे महिला जाऊ शकतात. या देशांत महिला एकट्या जाऊ शकतात.

पण जेव्हा एकटी मुलगी आपल्या शहरात सुरक्षित समजत नाहीत. तेव्हा परदेशात तरी आपण सुरक्षित फिरू शकू का? अशी शंका महिलांच्या मनात येते. तर तुम्हीही परदेशवारी करण्याचा विचार करत असाल तर हे काही देश तुमच्यासाठी अगदी सुरक्षित आहेत. जिथे तुम्ही मनमोकळं फिरू,खाऊ, नाचू, गाऊ शकता.

Solo Trip
महिलांनो, भारतात Solo Traveling करायचेय? बिनधास्त फिरा 'या' 5 ठिकाणी

ऑस्ट्रिया

हे ठिकाण दिसायला जेवढे सुंदर आहे, तेवढीच इथली माणसंही छान आहेत. एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना येथे कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. महिलांवर होणारे हल्ल्यांची संख्या अगदी कमी आहे. येथे फार कमी आहेत. रात्रीच्या वेळीही हे ठिकाण महिलांसाठी सुरक्षित मानले जाते.

युरोप

युरोपमधील आयर्लंडची जागा महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. इतर देशांच्या तुलनेत येथील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही खूपच कमी आहे. इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही एकटे प्रवास करत असलात तरी तुमच्याकडे कोणीही वाईट नजरेने पाहणार नाही. येथे पुरुषांचे वर्चस्व कमी असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. येथील सुरक्षा रँक 7.88 वर सेट करण्यात आली होती.

Solo Trip
Monsoon मध्ये प्रवासाचा आनंद लुटायचाय? तर Trip ला निघण्यापूर्वी करा ‘ही’ तयारी

स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड हा युरोपमधील सुंदर देश आहे. प्रत्येक महिलेला इथे जाण्याची इच्छा असते. इथेही महिला कोणत्याही टेंन्शनशिवाय फिरू शकतात. इथे प्रत्येकजण इतरांशी सौजन्याने वागतो. मुली किंवा अविवाहित महिला येथे आनंदाने प्रवास करू शकतात.

सिंगापूर

सिंगापूर हे आशिया खंडातील छोटे बेट देखील महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वोत्तम मानले जाते. येथे फिरायला गेलेल्या ९२ टक्के महिलांनी सांगितले की, त्यांना इथे सुरक्षित वातावरण मिळाले. घरी, किंवा हॉटेलकडे जातानाही त्यांना आपण परक्या देशात आहोत, काळजी घ्यायला हवी अशी भिती वाटली नाही. महिलांसाठी एकट्याने प्रवास करणे सोपे आहे.

Solo Trip
Weekend Trip : सुट्टी वाया घालवू नका; कमी खर्चात कधीही न पाहिलेल्या जागा पाहा!
सिंगापोरसारखा देशही महिलांसाठी सेफ आहे
सिंगापोरसारखा देशही महिलांसाठी सेफ आहेesakal

स्वीडन

या देशाची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे महिलांच्या सुरक्षेला खूप महत्त्व दिले जाते. देशात अनुचित घटना घडू नये यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. यामुळे या देशात फिरण्यासाठी गेलेल्या महिला पर्यटकही सुरक्षित आहेत.

कॅनडा

या यादीत पाचवे नाव कॅनडाचे आहे. महिलांसाठीही ही जागा सुरक्षित मानली जाते. हा सुंदर थंड देश सर्वांना समान संरक्षण प्रदान करतो. रात्रीच्या वेळीही येथे एकट्याने प्रवास करता येतो.

Solo Trip
Trip With Family : म्हणून सांगतोय, वर्षातनं एक तरी ट्रिप फॅमिलीसोबत केलीच पाहिजे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.