World Tourism Day 2024: जगातल्या या देशांमध्ये प्रवास करा अगदी फुकटात, कसे ते वाचा

World Tourism Day 2024: जागतिक पर्यटन दिनानिमित्त तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही विनामुल्य प्रवास करू शकता. कारण या देशांमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी कोणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत.
World Tourism Day 2024:
World Tourism Day 2024:Sakal
Updated on

World Tourism Day 2024: जगभरात दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी पर्यटन दिन साजरा केला जातो. लोकांना पर्यटनाचे महत्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तुमच्या जीवनात शिक्षणाचे जेवढे महत्व आहे तेवढेच प्रवासालाही महत्व आहे, कारण या काळात अनेक नव्या गोष्टींचा अनुभव घेता येतो. पण अनेक लोकांना प्रवासाची आवड असते, परंतु कधीकधी पैशांमुळे फिरायला जाणे टाळतात.

आज युरोपमधील एका देशाविषयी सांगणार आहोत, जेथे नागरिकांसोबतच जगभरातील पर्यटक एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी विनामुल्य प्रवास करू शकतात. इतकेच नाही तर या देशाची गणना जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये केली जाते. येथे अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. चला तर मग हा देश कोणता आहे हे जाणून घेऊया.

लक्झेंबर्ग

या देशाची गणना युरोपमधील सर्वात महागड्या देशांमध्ये केली जाते, परंतु तरीही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे पूर्णपणे विनामूल्य आहे.कारण संपूर्ण जगात हा पहिला देश आहे जिथे सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवा पुर्णपणे मोफत आहेत. यामध्ये बस, ट्रेन यासारख्या वाहतुकींचा समावेश होतो.

पर्यटकांना मिळतो फायदा

तुम्ही भारतात किंवा परदेशात कुठेही प्रवास करता तेव्हा तुम्हाला बस किंवा ट्रेनने प्रवास करताना पैसे द्यावे लागतात, पण लक्झेंबर्ग हे इतर देशांपेक्षा वेगळे आहे. येथे उपलब्ध असलेली मोफत सार्वजनिक वाहतूक सेवा देशातील नागरिकांनाच नाही तर येथे येणाऱ्या पर्यटकांनाही मोफत दिली जाते. म्हणजेच तुम्ही या देशात फिरायला येत असाल तर तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.

लक्झेंबर्ग सरकारने देशातील सर्व सार्वजनिक वाहतूक मोफत केली आहे. यामध्ये ट्रेन, बस, ट्राम यासारख्या वाहतुकींचा समावेश आहे. त्याचवेळी, जर प्रवाशाला पहिल्या श्रेणीत प्रवास करायचा असेल किंवा तुम्ही सीमा ओलांडून जात असाल तर तुम्हाला रेल्वेचे तिकीट खरेदी करावे लागेल.

World Tourism Day 2024:
Indira Ekadashi 2024: पितृ पक्षात इंदिरा एकादशी 27 की 28 सप्टेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त

यासोबतच सार्वजनिक वाहतुकीत सामान आणि पाळीव प्राण्यांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. देशातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी लक्झेंबर्ग सरकारने सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच नागरिकांनी किमान त्यांच्या कारमधून प्रवास कमी करावा आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा, अशी सरकारची इच्छा होती.

भारतीयांसाठी प्रवास मोफत आहे का?

भारतातून येणाऱ्या पर्यटकांना लक्झेंबर्ग सरकारने अद्याप मोफत व्हिसा सुविधा उपलब्ध करून दिली नाही. जेव्हा भारतातून कोणी या देशाला भेट देण्यासाठी जाईल तेव्हा त्या लोकांना व्हिसा घ्यावा लागेल. लक्झेंबर्गमध्ये प्रवास करण्यासाठी भारतीयांना शेंगेन व्हिसा काढावा लागतो.

प्रसिध्द ठिकाणे कोणती

लक्झेंबर्गमध्ये किल्ले प्रसिद्ध असून जगभरातून लोक पाहायला येतात. या देशाची गणना सर्वात श्रीमंत देशांमध्ये केली जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक या देशाला भेट देण्यासाठी येतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.