तुम्ही रोजच्या धकाधकीच्या जीवनात एक निवांतपणा शोधत असतात. तुम्ही कामावरून आल्यानंतर कॉफी पिणे, हे मनाला शांती देण्यासारखा आहे. गृहिणी दुपारच्या वेळी शांतपणे मोबाईल किंवा टीव्ही पाहत असतात हा त्यांचा निवांतपणा असू शकतो. प्रत्येकाचा निवांतपणा त्याच्या सोयीनुसार ठरलेला असतो.
वर्षातून एखादी तरी ट्रीप किंवा सहल करावी यातूनही मनाला शांतता मिळते. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी ऊर्जा मिळते. शरीरातील आणि मनातील आळस दूर होतो. हे ट्रॅव्हलिंगचे फायदे आहेत. तुम्हाला माहिती आहे का जितके फॅमिली सोबत फिरायला जाणे महत्त्वाचे आहे तितकेच गरजेचे सोलो ट्रिप करणे सुद्धा आहे.
सोलो ट्रिप केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. तरुण पिढीचा कल कुटुंबासोबत नाही तर एकट्याने फिरण्याकडे असतो. कारण त्यांना सोलो ट्रिपचे फायदे माहिती आहेत. आज जागतिक पर्यटन दिवस आहे. त्यानिमित्तानेच सोलो ट्रिपचे फायदे जाणून घेऊयात.
तुम्ही एखादं काम करण्यासाठी कुटुंबाची मदत घेत असतात. तुम्हाला वाटत असतं की ती गोष्ट तुम्हाला जमणारच नाही. कारण तितका आत्मविश्वास तुमच्यात नसतो. कुटुंबातील लोक तुमचा आत्मविश्वास परत मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही सोलो ट्रीपला गेल्यानंतर एखाद्या अडचणी सापडला तर तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास स्वतःच वाढवावा लागतो. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि धाडसी होता.
तुम्ही साउथ इंडियन 'डिअर कॉम्रेड' चित्रपट पाहिला असेल. त्यातील हिरो एका सोलो ट्रिपला निघतो आणि तिथे त्याला एक नवीन शोध लावता येतो. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी गोळा केलेले विविध पक्षांचे प्राण्यांचे आवाज. जंगलातील शांतता या सगळ्यातून तो मानवी मनाशी संबंधित आजारावर उपाय करू शकतो.
तसेच निसर्गात एकटे राहिल्याने तुम्ही तणाव मुक्त होता. तुमची रोजचे घर, ऑफिस, तीच लोक यांना कंटाळलेले असतात. तेव्हा निसर्ग, प्राणी, पक्षी, अशा गोष्टी तुम्हाला प्रेरणादायी ठरतात. ज्यांच्या सानिध्यात राहून तुम्ही तणावमुक्त होता.
e
तुम्ही सोलो ट्रिप वर असताना जर अचानक दरड कोसळली किंवा एखादा अपघात घडला. तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही एकटे झटता. हॉलीवुड मधील अनेक चित्रपट असेच असतात. एकट्याने संकटात सापडलेल्या व्यक्तीला मार्गही स्वतः शोधावा लागतो. तसे तुम्हीही स्वतःमध्ये हे स्किल डेव्हलप करू शकता.
काही लोकांच्या स्वभाव संकुचित असतो. ते चार लोकात मिक्स होत नाहीत. किंवा चार लोकांत मिसळले तरी देखील ते शांत असतात. किंवा त्यांना घरात चार लोक आलेले खपत नाहीत. असे लोक जेव्हा सोलो ट्रिप करतात तेव्हा अनोळखी लोकांना ते भेटतात.
रेल्वे स्टेशनवर असलेली गर्दी, एखाद्या अनोळखी गावात भेटलेले लोक त्यांना मदत करतात. ज्यामुळे त्या लोकांवरती त्यांचा विश्वास वाढतो आणि त्यांना अशा लोकांचा सहवास लागतो.
एकट्याने प्रवास केल्याने तुम्हाला स्वतःसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. याच्या मदतीने तुम्ही एखाद्या विषयावर चांगला विचार करू शकता. तुमचे विचार आणि भावना खोलवर समजून घेऊ शकता.तुमच्या मानसिक आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे.
या काळात तुम्ही स्वत:च्या चूका, कमीपणा शोधू शकता. त्यावर विचार करून स्वत:मध्ये योग्य ते बदल करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.